आलिया भट्टने केले साऱ्यांनाच घायाळ

‘स्टुडंट ऑफ दी इयर’ या करण जोहरच्या सिनेमातून पदार्पण करणारी महेश भट्ट यांची मुलगी आलिया भट्टने पदार्पणातच आपली चमक दाखवून दिली.

Updated: Feb 21, 2013, 02:02 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
‘स्टुडंट ऑफ दी इयर’ या करण जोहरच्या सिनेमातून पदार्पण करणारी महेश भट्ट यांची मुलगी आलिया भट्टने पदार्पणातच आपली चमक दाखवून दिली. आणि त्यामुळेच करण जोहर तिला आपल्या आगामी सिनेमातही घेणार असल्याचे जाहीर केले. मात्र नुकतीच बॉलिवूडच्या या नव्या अभिनेत्रीने एका कार्यक्रमात पारदर्शी वस्त्रे परिधान करून साऱ्यांचाच नजरा आपल्याकडे वळवून घेतल्या.
त्यामुळे आलिया बरीच चर्चेत आली आहे. मर्डर-३ या सिनेमाच्या प्रिमीअर शोसाठी आली असताना तिच्या या मादक अदांनी उपस्थित मात्र चांगलेच घायाळ झाले. यावेळेस तिने निळ्या रंगाचा पारदर्शक असा गाऊन परिधान केला होता. आलियाने पारदर्शी गाऊन परिधान करून साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. आणि तिचे वस्त्र असे काही होते की, साऱ्यांच्या नजरा तिच्यावरच खिळून राहिल्या होत्या. आलियाच्या मादक अदांनी प्रत्येक जण तिच्याकडेच पाहत होते.
तिच्यासोबत तिचे वडील महेश भट्ट आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यही उपस्थित होते. मात्र आलिया या पार्टीत चांगलच एन्जॉय करताना दिसून आली. बऱ्याचदा भट्ट प्रोडक्शनच्या अभिनेत्री ह्या बोल्ड आणि सेक्सी असतात. त्यामुळे आलियासुद्धा ही परंपरा कायम ठेवण्याच्या मूडमध्ये दिसते आहे.