अक्षय कुमार आमिरच्या वक्तव्यावर काय म्हणतोय...

आमिर खानने केलेल्या देशातील असुरक्षित वाटत असल्याच्या विधानानंतर संपूर्ण देशातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. याबद्दलच, सिनेमाच्या प्रमोशनसाठी दाखल झालेल्या अक्षय कुमारलाही पत्रकारांनी काही प्रश्न विचारून भंडावून सोडलं.  

Updated: Nov 25, 2015, 01:02 PM IST
अक्षय कुमार आमिरच्या वक्तव्यावर काय म्हणतोय...  title=

नवी दिल्ली : आमिर खानने केलेल्या देशातील असुरक्षित वाटत असल्याच्या विधानानंतर संपूर्ण देशातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. याबद्दलच, सिनेमाच्या प्रमोशनसाठी दाखल झालेल्या अक्षय कुमारलाही पत्रकारांनी काही प्रश्न विचारून भंडावून सोडलं.  

अनेक सिने-कलाकारांनी ही याबाबत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये अनुपम खेर, ऋषी कपूर यांनी आमिर खानच्या या वक्तव्याला जोरदार विरोध केलाय. याचबद्दल बॉलीवुडचा खिलाडी अक्षय कुमार याला जेव्हा विचारण्यात आले तेव्हा त्यानं आमिरबद्दल कोणतीही थेट प्रतिक्रिया देणं टाळलं.

मात्र, 'असहिष्णुता आणि अॅवार्डवापसी' संदर्भात विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावर बोलताना 'मी एक भारतीय आहे आणि मला त्याचा गर्व आहे' असं अक्षयनं म्हटलं... पण, पुढे 'असहिष्णुता याबद्दलच बोलायचं झालं तर याविषयी वेगवेगळ्या लोकांची मतं ही वेगवेगळी असू शकतात' असंही त्यानं म्हटलंय.  

अक्षय कुमारचा 'एयरलिफ्ट' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहे...  याच सिनेमाच्या प्रमोशनसाठी दाखल झालेल्या अक्षयला पत्रकारांनी विविध विषयांवर प्रश्न विचारले.  परंतु, आमिर खानबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नांना मात्र 'आपल्याला याविषयी काहीच माहित नाही' असं म्हणत त्यानं टाळलं. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.