‘लग्नापूर्वी अॅशचे माझ्याशी होते संबंध’

बॉलिवूडमधल्या एका प्रतिष्ठित घरण्याची सून आणि माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय-बच्चन पुन्हा एकदा चर्चेत आलीय. परंतु, यावेळी चर्चा ती गर्भवती असण्याबद्दल नीह तर वेगळीच आहे...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 11, 2014, 10:40 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बॉलिवूडमधल्या एका प्रतिष्ठित घरण्याची सून आणि माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय-बच्चन पुन्हा एकदा चर्चेत आलीय. परंतु, यावेळी चर्चा ती गर्भवती असण्याबद्दल नीह तर वेगळीच आहे...
मूळ श्रीलंकन असलेल्या एका व्यक्तीनं ऐश लग्नापूर्वी आपल्यासोबत संबंधात असल्याचा दावा केलाय. एव्हढंच नाही तर ज्या वेळेस ऐश बोहल्यावर चढली तेव्हा आमच्या दोघांत रोमान्टिक संबंध होते, असंही या व्यक्तीनं म्हटलंय.
एका वर्तमानपत्रानं दिलेल्या बातमीनुसार, मूळ श्रीलंकन नागरिक निरोशन देवप्रिय यानं हा दावा केलाय. ऐश्वर्यानं केलेल्या विश्वासघातामुळे आपण डिप्रेशनमध्ये गेल्याचंही देवप्रियनं म्हटलंय. आपल्याला धोका देऊन ऐश्वर्यानं अभिषेक बच्चनसोबत लग्न केल्याचं त्यानं म्हटलंय.
देवप्रियच्या म्हणण्यनुसार, ऐश्वर्याशी संबंध असल्यानंच त्याला डिप्रेशनसारख्या मानिसिक आजारांना तोंड द्यावं लागलं. परंतु, आत्तापर्यंत देवप्रियनं ऐश्वर्याविरुद्ध कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. यासंबंधी देवप्रिय आता बच्चन कुटुंबीयांच्या प्रतिक्रियेची प्रतिक्षा आहे.
ऐश्वर्यानं आपल्याला उद्ध्वस्त केलंय... तिच्यामुळेच मी सध्या आजारग्रस्त आणि कंगाल झालोय, असं म्हणत आपल्या आत्ताच्या परिस्थितीला देवप्रियनं ऐश्वर्याला जबाबदार धरलंय. देवप्रिय सध्या तैवानमध्ये राहतो.
7 वर्षांपूर्वी ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांनी 20 एप्रिल 2007 रोजी लग्नगाठ बांधली होती. यापूर्वी ऐश्वर्याचं नाव अभिनेता सलमान खान आणि विवेक ऑबेरॉय यांच्यासोबतही जोडलं गेलं होतं. तर अभिषेकचंही नाव अभिनेत्री करिश्मा कपूरशी जोडलं गेलं होतं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.