www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
चेन्नई एक्सप्रेसचा फर्स्ट ट्रेलर लोकांसमोर आला तो सुसाट वेगानेच. ‘बॉलीवूडचा बादशहा’ म्हणून ओळख असणारा शाहरूख खान येत्या ८ ऑगस्टला रिलीज होणाऱ्या चेन्नई एक्सप्रेसमधून पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर येतोय. 'ईद'च्या दिवशी लोकांना चेन्नई एक्सप्रेसची मेजवानी मिळणार आहे.
यावेळी रोहीत शेट्टीची स्तुती करता करता शाहरुख थकत नाहीए. फिमेल फॅनमध्येही आपल्यापेक्षा रोहीतचं जास्त लोकप्रिय आहे, असं शाहरुखला वाटतंय. ‘हा माझ्यासाठी पहिलाच चित्रपट होता जिथं लोकांसाठी हिरोपेक्षा दिग्दर्शक जास्त अॅट्रॅक्टिव्ह वाटत होता. पुढच्या वेळी जर मी रोहितबरोबर काम करत असेन तर मला त्याचा चेहराच कपड्यानं झाकून टाकावा लागेल’ असं शाहरुख गमतीनं म्हणतोय.
शाहरुख खानच्या चेन्नई एक्सप्रेसचे दिग्दर्शन रोहित शेट्टी यानं केलंय. रोहितनं याआधी गोलमाल, गोलमाल रिटर्न, सिंघम यांसारखे अनेक हिट चित्रपट दिलेत. शाहरुखसोबतचा हा त्याचा पहिलाच चित्रपट... ‘जब तक है जान’ या रोमांटिक चित्रपटानंतर शाहरुख खान चेन्नई एक्सप्रेसमध्ये ढिशूम ढिशूम करताना दिसणार आहे.
या चित्रपटाच्या शूटिंगसंबधी शाहरुखला विचारले असता तो म्हणाला की, 'रोहित शेट्टीबरोबर काम करताना खूप मजा आली. तो एक उत्तम दिग्दर्शक आहे. रोहित शेट्टी नेहमीच दर्जेदार चित्रपट बनवतो. त्याच्या चित्रपटात नेहमीच वेगवेगळे विषय असतात. शाहरुखच्या मते रोमॅंटिक भूमिकेपेक्षा तो अॅक्शनपट भूमिका चांगली करु शकतो.
अक्षय कुमारचा ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई’ आणि शाहरुखचा चेन्नई एक्सप्रेस एकाच दिवशी बॉक्स ऑफिसवर धडकणार आहेत. या दोघांपैकी कोणाची गाडी सुसाट धावेल हे येत्या ८ ऑगस्टलाच कळेल.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.