आमिरच्या ‘धूम’नं शाहरुखच्या ‘एक्स्प्रेस’ला टाकलं मागे

यश राज फिल्म्सचा बहुचर्चित धूम सिरीजमधला तिसरा सिनेमा ‘धूम ३’ या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर झळकला. या सिनेमाला ‘फर्स्ट डे, फर्स्ट शो’ चांगलं ओपनिंग मिळालंय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Dec 21, 2013, 02:24 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
यश राज फिल्म्सचा बहुचर्चित धूम सिरीजमधला तिसरा सिनेमा ‘धूम ३’ या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर झळकला. या सिनेमाला ‘फर्स्ट डे, फर्स्ट शो’ चांगलं ओपनिंग मिळालंय.
बहुचर्चित " धूम-३"नं बॉक्स ऑफिसवर धूम माजवत पहिल्या दिवशीच तब्बल ३५ कोटींची कमाई केलीय. बॉक्स ऑफिसवरील या कलेक्शनमुळं त्यानं ‘चेन्नई एक्स्प्रेस’लाही मागे टाकलंय. चेन्नई एक्स्प्रेस चित्रपटानं पहिल्या दिवशी ३३.१२ कोटी रुपयांची कमाई केली होती. `धूम ३` चित्रपट भारतातील सुमारे साडेचार हजार स्क्रीन्सवर प्रदर्शित झालाय.
आमिर खाननं साकारलेला व्हिलन, बाईक स्टंट्स, कतरीना कैफ आणि सिनेमाचा फ्रेश लुक यामुळं, चित्रपट चर्चा आणि उत्सुकतेचा हा चित्रपट बनलाय.
धूम सीरिजमधला हा तिसरा सिनेमा असून आमीर खानसोबतच अभिषेक बच्चन, कतरीना कैफ आणि उदय चोप्रा यांची या सिनेमात प्रमुख भूमिका आहे. परदेशी लोकेशन्सवर या सिनेमाचं चित्रिकरण झालं असून आमीरच्या चाहत्यांसाठी वर्ष सरत्या धूम -३ एक पर्वणी ठरलाय. फस्ट डे फस्ट शो पाहणाऱ्या प्रेक्षकांना धूम-३ भलताच आवडलाय. या सिनेमाला ८५ टक्के ओपनिंग मिळालंय. समिक्षकांनी मात्र सिनेमाला नापंसती दर्शवली असून कमी रेटींग दिलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.