दहशतवादी कसाबला पुण्यात फाशी
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील दोषी पाकिस्तानचा क्रुरकर्मा अजमल कसाब याला आज बुधवारी सकाळी साडेसात वाजता पुण्यातील येरवडा कारागृहात फाशी देण्यात आल्याची माहिती, राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिली.
डासाकडूनच कसाबचा हिसाब! कसाबला `डेंग्यू`!
26/11 हल्ल्यातला दहशतवादी मोहम्मद अजमल कसाब, याला डेंग्यूची लागण झाली आहे. ऑर्थर रोड जेलमध्येच त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
कसाबच्या वकिलाने नाकारली फी, केलं देशप्रेम व्यक्त
मुंबईवर हल्ला करणाऱ्या क्रूरकर्मा कसाबाची केस लढवणारे वकिल राजू रामचंद्रन यांनी केस लढविण्याची फी नाकारली आहे. त्यामुळे नवा एक पायंडा घातला आहे.
कसाबवर दया नाहीच!
फाशीच्या शिक्षेस स्थगिती देण्याची विनंती करणारा दहशतवादी अजमल कसाबचा दयेचा अर्ज राज्याच्या गृहमंत्रालयानं फेटाळलाय. तसे मुख्यमंत्र्यांना गृहखात्यानं कळविले आहे.
कसाबचा दयेचा अर्ज
दहशतवादी अजमल कसाबनं राष्ट्रपतींकडं दयेचा अर्ज केलाय. सुप्रीम कोर्टानं कसाबची फाशीची शिक्षा कायम केलीये. त्यानंतर कसाबनं आज आर्थर रोड तुरुंग अधीक्षकांमार्फत राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केलाय.
कसाबसंदर्भात शिवसेनेचं राष्ट्रपतींना पत्र
भारताच्या सुप्रीम कोर्टानेही अजमल कसाबच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केल्यामुळे कसाबला फाशी होणार आहे. मात्र त्यासाठी सर्वांत आवश्यक गोष्ट म्हणजे राष्ट्रपतींची परवानगी. यासाठीच शिवसेनेने राष्ट्रपतींना पत्र पाठवलं आहे.
आशाताई कसाबलाही अतिथी देवो भव म्हणणार का?- राज
सूरक्षेत्रच्या वादावरुन, आशा भोसलेंवर राज ठाकरेंनी जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. आशाताईंचं हे `अतिथी देवो भव आहे की पैसे देवो भव`,
कसाबवरील खर्च एक अब्जावर जाणार
दहशतवादाचे भयाण सावट केवळ भारतावरच नव्हे, तर जगभर सगळीकडेच पडलेले आहे. गेल्या दशकभरात ६६ देशांतील लाखो दहशतवाद्यांना अटक करण्यात आली व दहशतवाद्यांना न्यायालयांनी शिक्षाही सुनावल्या. भारताची परिस्थिती मात्र उलटी आहे.
कसाबच्या आधी याला फासावर लटकवा- बाळासाहेब
म्यानमार आणि आसाममधील घुसखोर बांगलादेशींसाठी शनिवारी धर्मांध मुस्लिमांनी मुंबईतील फोर्ट परिसरात हैदोस घातला. मात्र या साऱ्यात क्लेशकारक गोष्ट घडली.
ऐकले का, कसाब आणि जिदांल भेटले
२६/११ हल्लाप्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचने दहशतवादी कसाब आणि अबू जिंदालची समोरासमोर बसून आज चौकशी केली. या चौकशीत कसाबनं अबू जिंदालला ओळखलं आणि जिंदालनेचहिंदी शिकवलं असल्याची कबुली दिली.
अबब... कसाबवर २५ कोटी ७५ लाख खर्च
मुंबई हल्ल्यातील आरोपी अजमल कसाबवर सरकारने आतापर्यंत 25 कोटी 75 लाख रुपयांचा खर्च केला आहे. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विधान परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना हि माहिती दिली आहे.
कसाबला फाशी ऐवजी जन्मठेप हवी
२६ / ११ च्या मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यातील अतिरेकी अजमल कसाब याच्या वकिलाने सुप्रीम कोर्टामध्ये मंगळवारी फाशी न देता जन्मठेपच द्या अशी विनंती कोर्टापुढे केली. कसाबच्या फाशीवर निर्णय घेण्यासाठी सुप्रीम कोर्टात खटला सुरू असून राजू रामचंद्रन यांना कसाबची बाजू मांडण्यास सांगितलं.
अण्णांची मागणी, कसाबला फाशी द्या
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातला दोषी अजमल कसाबला फाशी देण्याची मागणी अण्णा हजारेंनी केली आहे. सरकारनं अजमल कसाबला पोसणं, चुकीचं असल्याचा जोरदार टोलाही अण्णांनी लगावला.