कसाबच्या आधी याला फासावर लटकवा- बाळासाहेब

म्यानमार आणि आसाममधील घुसखोर बांगलादेशींसाठी शनिवारी धर्मांध मुस्लिमांनी मुंबईतील फोर्ट परिसरात हैदोस घातला. मात्र या साऱ्यात क्लेशकारक गोष्ट घडली.

Updated: Aug 13, 2012, 08:41 AM IST

www.24taas.com
म्यानमार आणि आसाममधील घुसखोर बांगलादेशींसाठी शनिवारी धर्मांध मुस्लिमांनी मुंबईतील फोर्ट परिसरात हैदोस घातला. मात्र या साऱ्यात क्लेशकारक गोष्ट घडली ती म्हणजे भारतीय सीमेवर आपले रक्त सांडणाऱ्या जवानांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या ‘अमर जवान’ स्मारक फोडण्यात आले. हल्ल्यात आणि जाळपोळीत प्रचंड नुकसान झाले असले तरी सर्वात मोठा आघात झाला ‘अमर जवान’ या क्रांतिस्तंभावर.
२६/११ला कसाब टोळीने मुंबईवर केलेल्या हल्ल्यातील शहीदांचा स्मृतिस्तंभ आणि १८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामातील शहीद जवानांचा पवित्र क्रांतिस्तंभ यावर या धर्मांधाने हल्ला करून प्रचंड तोडफोड केली. या स्मारकातील बंदूक उखडून टाकत तिथे नंगानाच केला. या दंगलीतील हा सर्वात मोठा गुन्हेगार आहे. ‘या अवलादीला ताबडतोब पकडा आणि कसाबच्या आधी त्याला जाहीरपणे फासावर लटकवा, अशीच मागणी सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून करण्यात आली आहे.
आसाम आणि म्यानमारमधील घुसखोर मुसलमानांसाठी मुंबईत हैदोस घालणार्याआ धर्मांधांच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांनी सुरुवात केली. २३ दंगलखोरांना अटक करून त्यांच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, महिला पोलिसांचा विनयभंग, दरोडा, जाळपोळीसाठी स्फोटक पदार्थांचा वापर अशी कलमे लावण्यात आली आहेत. सर्वांना १९ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
ही दंगल पूर्वनियोजित कट होता, असे न्यायालयात सांगत पोलिसांनी आरोपींना रिमांड मागितला. हे सर्व दंगलखोर बेहरामपाडा, कुर्ल्याचा कसाईवाडा आणि मुंब्र्यातील असल्याचे समोर आले असून मोर्चा आयोजित करणार्याल ‘रझा अकादमी’ या प्रमुख संघटनेलाही पोलिसांनी ‘हिटलिस्ट’वर घेतले आहे.