विशेष संपादकीय : हॅलो ब्रदर, सलमान

सध्या तुझा बजरंगी भाईजान 100 कोटींचे नवे विक्रम रचतोय. तिकडे आपल्या नवनवीन ट्विटमुळे तू आपल्या वादांचा नवा विक्रम रचतोय. हिट अँड रन प्रकरणी शिक्षा झालेल्या सलमानला अडीचशे निरपराधांच्या हत्येचा कट रचणारा याकूब 'भाईजान' वाटतो. 

Updated: Jul 26, 2015, 06:05 PM IST
विशेष संपादकीय : हॅलो ब्रदर, सलमान title=

संपादक डॉ. उदय निरगुडकर : सध्या तुझा बजरंगी भाईजान 100 कोटींचे नवे विक्रम रचतोय. तिकडे आपल्या नवनवीन ट्विटमुळे तू आपल्या वादांचा नवा विक्रम रचतोय. हिट अँड रन प्रकरणी शिक्षा झालेल्या सलमानला अडीचशे निरपराधांच्या हत्येचा कट रचणारा याकूब 'भाईजान' वाटतो. 

इकडे त्याचे नातेवाईक बजरंगी भाईजान या भारत-पाक संबंधांच्या चर्चेतून पैसे कमावणाऱ्या सिनेमाच्या 'करमाफी'साठी मंत्र्यांचे उबंरठे झिजवतायत...तर तिकडे याकूबला फाशीमाफी मिळावी म्हणून सल्लूमियाँ तासाभरात चौदा चौदा ट्वीट करतोय...

सलमानचा पुळका असलेले त्याच्या ट्वीटचं समर्थन करतील देखील...त्यांनी ते करावंच...! पण, 250 कुटुंबांनी आपल्या घरातली माणसं गमावली, तेव्हा हा 'दंबग' खान नेमका होता कुठे? हे देखील तपासून पाहवं...! आता त्यानं केलेले ट्विट हे याकूब आणि तो 'हम साथ साथ है' असं दाखवणारे नाहीत का? यानिमित्तानं गुन्हेगारांचा 'बॉडीगार्ड' कोण? हे समाजासमोर आलं हे उत्तमचं झालं....

सलमान; गुन्हेगारांच्या कळवळ्याचे असेच ट्विट करत रहा, मग प्रेक्षक तुझ्या चित्रपटाला 'नो एन्ट्री'चा बोर्ड दाखवतील!
गेट वेल सून....ब्रदर..

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.