पैसा नाही टिकत हाती, ही गोष्ट करा घराच्या दाराशी

पैसा हा माणसाच्या आयुष्यात फारच महत्त्वाचा असतो. पैसा नसला की माणसाची समाजात किंमत केली जाते. आणि त्यामुळेच पैशासाठी आयुष्यभर आपण झगडत असतो.

Updated: Dec 4, 2012, 05:14 PM IST

www.24taas.com
पैसा हा माणसाच्या आयुष्यात फारच महत्त्वाचा असतो. पैसा नसला की माणसाची समाजात किंमत केली जाते. आणि त्यामुळेच पैशासाठी आयुष्यभर आपण झगडत असतो. पैसा घरात टिकून राहण्यासाठी पुढील काही गोष्टी केल्यास तुम्हांला कधीच अडचण येणार नाही. दिवसरात्र कष्ट करूनही आवश्यक तेवढे पैसे मिळविता येत नाही. त्यामुळे काही गोष्टी काटेकोरपणे पाळल्यास त्याचा नक्कीच फायदा तुम्हांला होईल.
गाईचे शेण अनेक अडचणी दूर करण्यास सक्षम आहे. दररोज घरासमोर एखाद्या स्वच्छ ठिकाणी जमिनीवर शेणाने सारवा. त्यावर लक्ष्मीची पावले रेखाटा आणि कुंकू, तांदूळ चढवा. असे दररोज करा. असे केल्याने घरातील पैशाची तंगी जाईल आणि महालक्ष्मी प्रसन्न होईल.
ध्यानात ठेवा की, ही विधी अशा ठिकाणी करा की जिथे कोणाचे पाय लागणार नाहीत. या साधनेसोबतच प्रामाणिकपणे परिश्रम करणे थांबवू नका. कोणत्याही प्रकारचे अधार्मिक कृत्य करू नका.