www.24taas.com, मुंबई
स्मशानभूमीबद्दल प्रत्येक माणसाच्या मनात एक प्रकारचं गूढ आकर्षण असतं, तसंच भीतीही असते. पूर्वीच्या काळी स्मशानभूमी ही गावाच्या बाहेर असायची. मात्र आता वाढत्या शहरीकरणामुळे स्मशानं शहरांमध्येच येऊ लागली आहेत. तरीही संध्याकाळनंतर स्मशानाच्या दिशेने जाऊ नये असं लोक सांगतात.
स्मशानापासून दूर का राहावं, असा प्रश्न आजच्या तरुणांना पडणं स्वाभाविक आहे, तसंच घरातील जुने जाणते लोक असं सांगतात, तेव्हा त्यामागे काहीतरी कारणही असेलच. कारण ही नुसती अंधश्रद्धा असू शकत नाही. या मागचं कारण म्हणजे रात्रीच्या प्रहरी स्मशानामध्ये नकारात्मक शक्ती मोठ्या प्रमाणावर उत्सर्जित होत असतात. या शक्तींचा वापर वामपंथी, अघोरी वृत्तीचे लोक आपल्या फायद्यासाठी करतात. मात्र सर्वसामान्य व्यक्ती या नकारात्मक शक्तींच्या प्रभावाखाली सहज येऊ शकतात.
उदास मनःस्थितीतील किंवा भावनाशील व्यक्ती या नकारात्मक शक्तींच्या प्रभावाखाली आल्यास तिचं मनःस्वास्थ्य ढळण्याची शक्यता वाढते. मनामध्ये सतत नकारात्मक आणि अशुभ विचार येऊ लागतात. यामुळे कुठल्याही चांगल्या गोष्टी घडत असताना आपल्याच हातून त्या बिघडवण्याचं कामही अशा व्यक्ती करतात. आणि यामुळे नैराश्याला सामोरं जावं लागतं. यामुळे रात्रीच्या काळात स्मशानाकडे जाणं टाळावं.