पैशाच्या चणचणीने बेहाल, दारावर लावा घोड्याची नाल

घोड्याच्या नालेचा घराच्या आर्थिक परिस्थितीशी काय संबंध? असा प्रश्न पडेल.. पण काही गोष्टींची उत्तरं आकलनापलिकडे असतात आणि परिणाम मात्र आपल्या समोर असतात.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 30, 2012, 01:08 PM IST

www.24taas.com
तंत्रमंत्रांद्वारे दैनंदिन जीवनातल्या अनेक समस्या सुटू शकतात. अनेक लहान मोठ्या गोष्टींचा उपयोग करून घराततील समस्या सुटू सकतात. बहुतेक घरांमध्ये दाराजवळ घोड्याची नाल ठोकलेली दिसून येते. या मागे एक शास्त्र आहे.
घराची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आणि घरात समृद्धी नांदावी यासाठी दारात घोड्याची नाल बसवली जाते. आता घोड्याच्या नालेचा घराच्या आर्थिक परिस्थितीशी काय संबंध? असा प्रश्न पडेल.. पण काही गोष्टींची उत्तरं आकलनापलिकडे असतात आणि परिणाम मात्र आपल्या समोर असतात. घोड्याच्या नालेच्या बाबतीतही तसंच आहे. जर घोड्याची नाल दारावर लावलली, तर अनेक अशक्य वाटणारी कामं लगेच पूर्ण होतात.
जर घोडा काळ्या रंगाचा असेल, तर त्याची नाल प्रभावी ठरते आणि त्यातही जर त्याच्या उजव्या पायांची नाल मिळाली असेल, तर आपल्या सर्व अडचणी दूर होतात. शनिवारच्या दिवशी ही नाल आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर किंवा दुकानामध्ये ठोकावी. यामुळे वेगाने तुमची प्रगती होऊ लागते आणि आर्थिक समस्या दूर होते.