मुंबई : हिंदू धर्मात गुरुवारच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. गुरुवार हा बृहस्पतिंचा वार मानला जातो.
देवगुरु बृहस्पति धनू आणि मीन राशींचा स्वामी आहे. ज्योतिषशास्त्रानुसार गुरु धनकारक ग्रह आहे. ज्यांच्यावर गुरुची कृपा असते त्यांची आर्थिक स्थिती असते.
गुरुवारच्या दिवशी ब्रम्हमूहूर्तावर उठून सर्व कामे उरकून देवाचे स्मरण करा. यानंतर तुपाचा दिवा लावून भगवान विष्णूची पुजा करा. विधिवत पुजा झाल्यानंतर विष्णू सहस्त्रनामाचा जप करा.
भगवान विष्णू्च्या पुजेनंतर केशरचा टिळा लावा. केशर नसल्यास हळदीचा टिळा लावला तरी चालेल.
यादिवशी कोणी धन घेण्यास आल्यास देवू नका. गुरुवारच्या दिवशी माता-पित्याचा आशीर्वाद घ्या.
संध्याकाळच्या वेळेस झाडाच्या खाली दिवा लावा.