www.24taas.com
मानवी जीवनावर ग्रह हे नेहमीच परिणाम करताना दिसून येतात. शास्त्रीयदृष्टया देखील हे सिद्ध झालेले आहे. त्यामुळे ग्रहांचा थेट परिणाम हा तुमच्यांवर होत असतो. काही ग्रहांचा कसा परिणाम होतो हे आपणास पुढीलप्रमाणे पाहता येईल.
पुनर्वसू नक्षत्रात जन्म घेणारे बालक शांत, सुखी, सुशील, सुंदर, लोकप्रिय, धनी व बलवान, शास्त्राचे ज्ञान असणारे, दानी पुत्र असतात. मतांतरापासून असा जातक क्लेश सहन करणारा, बुद्धिहीन कामुक, रोगी आणि अल्पात संतुष्ट असणारा असतो. पुनर्वसू नक्षत्रात जन्म घेणारे बालक न्यायप्रिय, दानी, परोपकारी, इमानदार, विश्वसनीय, क्षमायुक्त, सौंदर्याचा उपासक, वास्तविक व योग्य निर्णय घेण्याची क्षमता असणारा, प्रभावशाली, तर्क प्रस्तुत करणारा, राजनीतीचे ज्ञान असणारा, नेतृत्व करण्याची क्षमता असणारा व भ्रमणप्रिय असतो.
पुनर्वसू नक्षत्राच्या पहिल्या तीन चरणांत जन्म झाल्यास राशी मिथुन, राशी स्वामी बुध व चवथ्या चरणात जन्म झाल्यास जन्म राशी कर्क तथा राशी स्वामी चंद्रमा, वर्ण शूद्र, वश्य प्रथम तीन चरणांमध्ये नर व अंतिम चरणात जलचर, योनी मार्जार, महावैर योनी मूषक, गण देव, नाडी आदी असते.