पहा जन्मवार सांगतो तुमचा स्वभाव...

तुमचा जन्मदिवस कोणता आहे. त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे अनेक घटना या त्याच्याशी निगडीत असतात.

Updated: Feb 22, 2016, 09:31 PM IST

www.24taas.com तुमचा जन्मदिवस कोणता आहे. त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे अनेक घटना या त्याच्याशी निगडीत असतात. कोणत्या दिवसाचे काय आहे महत्त्व जाणून घ्या.

सोमवार

ह्या दिवशी जन्मलेली व्यक्ति शांत स्वभावी, गोड बोलणारी त्याचप्रमाणे व्यवहारज्ञानी असते. मोठयांचं अनुकरण करणारी, त्यांच्या आज्ञेत राहणारी, सुखदु:खात समान राहणारी आणि उदार असते.

मंगळवार

ह्या दिवशी जन्मलेली व्यक्ति बाताडी, खोटं बोलणारी, भांडण्यात तत्पर, उच्च हुद्दाधारी, शेतीच्या कामात रस घेणारी आणि तापट असते.

बुधवार

ह्या दिवशी जन्मलेली व्यक्ति रुपवती, गोड बोलून टीकाटिप्पणी करणारी, मस्करी करण्यात हुशार, हरहुन्नरी, इतरांचे गुण- अवगुण पारखणारी, अब्रुची काळजी घेणारी आणि व्यवसायिक वृत्तीची असते.

गुरुवार

ह्या दिवशी जन्मलेली व्यक्ति उत्तम विद्याभ्यासी, स्वत:च्या इच्छेनुसार वागणारी, मनमिळाऊ स्वभावाची, अक्कलहुशारीनं धन मिळवणारी आणि थोरांकडून मान- सन्मान मिळवणारी असते.

शुक्रवार

ह्या दिवशी जन्मलेली व्यक्ती काळ्या- कुरळ्या केसांची, उत्तम वस्त्रं परिधान करावयाची हौस असणारी, सदाचारी, मोठयांची मानमर्यादा राखणारी आणि उच्च हुद्द्यावर नोकरी करणारी असते.

शनिवार

ह्या दिवशी जन्मलेली व्यक्ति अतिशय बुद्धिवान, मंत्र -तंत्र विद्येत रस असलेली, मायाळू, स्वकर्तृत्ववान आणि सर्वांना आवडेल अशी असते.

रविवार

ह्या दिवशी जन्मलेली व्यक्ति बहादुर, गहुवर्णी, उत्साही, दानशूर आणि ती इतकी मनस्वी असते की निवडलेल्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होते.