www.24taas.com, मुंबई
पुजेनंतर आरती केली जाते आणि आरती संपताना कापूर जाळून शेवटची आरती केली जाते. आरतीच्या वेळी कापूर का जाळावा, यामागे एक शास्त्र आहे.
कापराचा वास सुंदर असतो. तसंच कापूर जाळल्यावर त्याचे माग कुठलेही चिन्ह उरत नाही. असा कापूर जाळल्यामुळे वातावरण पवित्र आणि शुद्ध होतं. कर्पूरारतीचा धूप घेतल्यास शरीराची वेगवेगळ्या व्याधींपासून सुटका होते.
कापूर जाळताना विशेषतः खालील मंत्र म्हटला जातो-
कर्पूरगौरं करुणावतारं, संसारसारं भुजगेन्द्रहारम् ।
सदावसन्तं हृदयारविन्दे, भवं भवानीसहितं नमामि ॥
याचं कारण म्हणजे शिवशंकराची कांती कापरासारखी गोरी असते. कापूर जाळल्यास अनेक दोषांचे निवारण होते. पितृदोष, देवदोष यांचेही निवारण होते. कापराचा चुरा घरात ठेवल्यास घरातील वातावरण शांत राहाते. एकाग्रता वाढते. कापराचं संप्लवन होत असल्यामुळे कापूर जाळण्यासाठी तेल-तुपाची गरज पडत नाही.