प्रभात समयीच का करतात देवपूजा?

देवाची पूजा सकाळीच करावी, असं शास्त्रांत सांगितलं आहे. सकाळी उठल्यावर अंघोळ करून शूचिर्भूत होऊन देवाची पूजा केली जाते. सकाळी सूर्योदयाच्या वेळी पूजा करावी. या मुहुर्ताला ब्रह्ममुहूर्त म्हटले जाते.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 12, 2012, 08:59 PM IST

www.24taas.com, मुंबई
देवाची पूजा सकाळीच करावी, असं शास्त्रांत सांगितलं आहे. सकाळी उठल्यावर अंघोळ करून शूचिर्भूत होऊन देवाची पूजा केली जाते. सकाळी सूर्योदयाच्या वेळी पूजा करावी. या मुहुर्ताला ब्रह्ममुहूर्त म्हटले जाते.
देवाची पूजा सकाळीच का केली जावी, यामागे शास्त्र आहे. सकाळी आपण जेव्हा उठतो, तेव्हा आपण ताजे तवाने असतो. शरीर थकलेलं नसतं. त्यामुळे सबंध दिवसामध्ये सकाळचीच वेळ उत्कृष्ट असते. सकाळी आपलं मनही शांत असतं. मनात विचारांची गर्दी नसते. त्यामुळे मन एकाग्र करून आपण व्यवस्थित पूजा करू शकतो.
एकदा दिवस सुरू झाला, की आपली धावपळ सुरू होते, दगदग होते. यामुळे मनात वेगवेळे विचार सुरू होतात. काम करून आपण थकलेलो असतो, अंगातील उत्साह कमी झाला असतो. अशावेळी देवाच्या पुजेच्यावेळी आपण एकाग्र चित्ताने पूजा करू शकत नाही. सकाळी पूजा केल्यामुळे मनात पवित्र विचार येतात. मन शांत होतं आणि समाधान लाभतं. यामुळे दिवसभर काम करण्याची ऊर्जा मिळते. या सर्व कारणांमुळे शास्त्रांत ब्राह्ममुहूर्तावर म्हणजेच सकाळी पूजा करण्यास सांगितलं आहे.