www.24taas.com, मुंबई
घरची आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण असली, तरीही घरातील काही गोष्टी तुमची स्थिती सुधारू शकतात. कोथिंबिर, मीठ आणि हळद हे केवळ अन्नपदार्थांचा स्वाद वाढवणारे पदार्थ आहेत, असं नव्हे, तर हेच पदार्थ तुम्हाला अर्थिक परिस्थितीचाही स्वाद वाढवू शकतात.
घरातले जुने जाणकार नेहमी सांगतात, की ज्या घरात मीठ बांधलेलं असतं, त्या घराची भरभराट होते. यात तथ्य आहे. हळकुंडांच्या गाठींना तर गणपतीचंच रूप मानलं जातं. धणे तर धनाला अवाहन करत असल्यामुळेच त्यांना ‘धणे’ असं संबोधलं जातं.
ज्या घरात मीठ, धणे आणि हळकुंडं थोड्या प्रमाणात साठवून ठेवली असतील, त्या घराची हमखास भरभराट होते. धनदायिनी लक्ष्मी अशा ठिकाणी नेहमी वास करते. मीठाचे खडे जर इशान्य दिशेला ठेवल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते. शौचालय चुकीच्या जागी बांधले असल्यास त्याचे दोषही इशान्येला ठेवलेल्या मीठामुळे नष्ट होतात. यामुळेच, घरात सुख, शांती आणि समृद्धी येते.