www.24taas.com, मुंबई
भूत-प्रेत काही नसल्याचं म्हटलं जातं. किंवा भूत ही अंधश्रद्धा आहे, असं मानतात. पण तरीही भूत पाहिल्याचं अनेक जण म्हणतात. तेव्हा इतरांनी भूत पाहिलं नसल्यामुळे त्यावर कुणी विश्वास ठेवत नाही. कारण, जर इतरांना भूत दिसतं, तर आपल्याला का नाही असा प्रश्न आपल्याला पडतो. एखाद्या खास व्यक्तीलाच का भूत दिसतं, याचं उत्तर ज्योतिष शास्त्रात मिळतं. ज्योतिष शास्त्रानुसार ज्या व्यक्तींचा गण राक्षस गण असतो, त्यांनाच भूत दिसू शकतं किंवा भुताचं अस्तित्व जाणवू शकतं..
राक्षस गण हा शब्द अनेक जणांनी ऐकला असेल. मात्र, राक्षस गण महणजे नेमकं काय हे र कमी जणांना माहित असतं. बऱ्याच जणांना राक्षस गण म्हटल्यावर भीती वाटते. पण, त्यात घाबरण्यासारखं काही नाही. ज्योतिष शास्त्रानुसार मनुष्य योनीची ३ गणांमध्ये विभागणी केली गेली आहे- मनुष्य गण, देव गण आणि राक्षस गण
ज्योतिष शास्त्रानुसार देव गण आणि मनुष्य गणातील लोक सामान्य असतात. तर राक्षस गणाच्या व्यक्तींमध्ये काही विशिष्ट नैसर्गिक गुण असतात. त्यामुळे राक्षस गणाच्या व्यक्तींना वातावरणातील नकारात्मक शक्तींची ताबडतोब आणि प्रखर जाणीव होते. या शक्तींचा वातावरणातील प्रभाव राक्षस गणाच्या व्यक्तींवर जास्त पडत असल्यामुळेच त्यांना भूत किंवा आत्म्यांचं दर्शन घडतं. मात्र या वातावरणामुळेच राक्षस गणाच्या व्यक्तींमध्ये काही क्षमता विकसित होतात, ज्यामुळे या व्यक्तींना अमानवी गोष्टींची भीती वाटत नाही. राक्षस गणाचे लोक साहसीदेखील असतात. कुठल्याही विपरीत परिस्थितीत ते घाबरून जात नाहीत. या व्यक्तींना त्यामुळेच भूत किंवा आत्म्यांकडून त्रास होत नाही. केवळ अनुभव येतो.