सासरचे तीला देत होते खाण्यास शेण, पिण्यास गाईचे उष्टे पाणी

खायला गाईचे शेण आणि पिण्यासाठी जनांवराचे उष्टे पाणी द्याचे जेवायला मागितले तर लोखंडी सळईने मारहाण व्हायची. शौचालयात कोंडून ठेवले जायचे,  अत्याचार किती अमानवी असू शकतो. यांचा कोणी विचार ही करू शकणार अषा अत्याचाराला तोंड देणाऱ्या एका १९ वर्षीय विवाहितेची शेजारी राहणाऱ्या महिलांनीच सुटका केली आहे. सारिका संजय अग्रवाल असे या महिलेचे नाव असून ही घटना औरंगाबाद येथील मिसारवाडीच्या साईनगरात सोमवारी घडली.

Updated: Dec 1, 2015, 12:27 PM IST
सासरचे तीला देत होते खाण्यास शेण, पिण्यास गाईचे उष्टे पाणी  title=

औरंगाबाद : खायला गाईचे शेण आणि पिण्यासाठी जनांवराचे उष्टे पाणी द्याचे जेवायला मागितले तर लोखंडी सळईने मारहाण व्हायची. शौचालयात कोंडून ठेवले जायचे,  अत्याचार किती अमानवी असू शकतो. यांचा कोणी विचार ही करू शकणार अषा अत्याचाराला तोंड देणाऱ्या एका १९ वर्षीय विवाहितेची शेजारी राहणाऱ्या महिलांनीच सुटका केली आहे. सारिका संजय अग्रवाल असे या महिलेचे नाव असून ही घटना औरंगाबाद येथील मिसारवाडीच्या साईनगरात सोमवारी घडली.

परभणी जिल्ह्यातील  सारिकाचे लग्न संजय राजेंद्र अग्रवाल  याच्याशी सहा महिन्यांपूर्वी झाले. मुकुंदवाडीत राहणाऱ्या मावशीच्या ओळखीतील एकाने संजयचे स्थळ सुचवले होते. दोघे वेगवेगळ्या समाजातील असतानाही मावशीच्या मध्यस्थीमुळे हे लग्न झाले. 

सारिकाचा छळ होत असल्याची पुसटशी कल्पना शेजाऱ्यांना होतीच. घरातून मारहाण, रडण्याचा आवाज यायचा. पण घरगुती भानगडीत कशाला पडायचे म्हणून शेजारी गप्प होते. त्यातच सोमवारी सायंकाळी अग्रवाल यांच्या गाईचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या घरासमोर लोक जमले. महिलांना पाहून सारिकाला धीर आला. ती रडतच त्यांच्याकडे धावली. विचारपूस केल्यावर प्रकरण कळले. पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले असून पीडितेला रुग्णालयात दाखल केले आहे.

पाहा हृदयद्रावक व्हिडिओ 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.