धुळे, नंदूरबारमध्ये मतदान; काँग्रेस-राष्ट्रवादी आमने-सामने

धुळे, नंदूरबार आणि अकोला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आज मतदान होणार आहे. प्रशासकीय यंत्रणा नियुक्त ठिकाणी सज्ज करण्यात आली आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 1, 2013, 04:21 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, धुळे
अकोला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झालीये. सुरुवातीपासूनच जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मतदान केंद्रांवर मतदारांच्या रंग पाहायला मिळतायेत.
जिल्हा परिषदेच्या 53 आणि पंचायत समितीच्या 106 जागांसाठी हे मतदान होत आहे. या निवडणुकीत 8 लाख 31 हजार ९५० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या 53 जागांसाठी 307 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर पंचायत समितीच्या 106 जागांसाठी 568 उमेदवार आपलं नशीब आजमावतायेत. अकोला, आकोट, तेल्हारा, बार्शीटाकळी, बाळापूर, पातूर व मूर्तिजापूर या सातही पंचायत समित्यांसाठी ही निवडणूक होतेय.
या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना-भाजप, भारिप-बहुजन महासंघ, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बहुजन समाज पार्टी, समाजवादी पार्टी या राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. या मतदान प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील एकूण 1 हजार 188 मतदान केंद्रांवर 1 हजार 188 मतदान पथके कार्यरत असून या पथकांमध्ये मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकार्यांसचा समावेश आहे. 111 मतदान पथके राखीव ठेवण्यात आलीत. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीत जिल्ह्यात एकूण 160 मतदान केंद्र संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आलीत. दरम्यान निवडणुकीच्या निमित्ताने जिल्हाभरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. उद्या या निवडणुकीची मतमोजणी आहे. उद्या दुपारपर्यंत अकोला जिल्हा परिषद आणि सातही पंचायत समित्यांमधील राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे...
धुळ्यात काँग्रेस तर नंदूरबार जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीची सत्ता असल्याने हे दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले असून दोन्ही पक्षाची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.