ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर अस्मानी-सुलतानी संकट

औरंगाबाद जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात अडकलाय. एकीकडे कारखाना उसाचे पैसे देत नाही तर दुसरीकडे अस्मानी संकटही मोठं आहे.. त्यामुळे जगावं कसं असा प्रश्न आता शेतक-यांना पडलाय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 17, 2012, 08:48 AM IST

विशाल करोळे, www.24taas.com, औरंगाबाद
औरंगाबाद जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात अडकलाय. एकीकडे कारखाना उसाचे पैसे देत नाही तर दुसरीकडे अस्मानी संकटही मोठं आहे.. त्यामुळे जगावं कसं असा प्रश्न आता शेतक-यांना पडलाय.
औरंगाबादमधल्या पैठणच्या वैजनाथ एकनाथ सहकारी साखऱ कारखान्याच्या कारभाराला शेतकरी चांगलेच वैतागलेत. महागाई, दुष्काळ या दुष्टचक्रात अडकलेल्या शेतक-यांची हक्क्याचे पैसे न मिळाल्यानं आणखीनच अडचण झालीय गेल्या हंगामात वैजनाथ सहकारी साखर कारखान्यानं उसाला 2010 -2011 मध्ये प्रती टन 1750 रुपयांचा दर जाहीर केला. मात्र 1500 रुपये इतका भाव दिला. मात्र तब्बल सात महिन्यांनी दुसरा हप्ता देताना टनाला 100 रुपयांचा भाव दिला. मात्र त्यानंतर कारखान्यानं पैसेच दिलेले नाही. 2011 -12 मध्ये सुद्धा सरकारनं 1800 रुपये टन हमीभाव जाहीर केला. मात्र यंदाही शेतक-यांना सुरुवातीला 1500 रुपये दिलाय. आणि आता उर्वरित थकीत पैसे शेतक-यांना कधी मिळणार असा प्रश्न पडलाय.

वैजनाथ एकनाथ सहकारी साखऱ कारखाना पैसे देत नसल्यामुळे काही शेतक-यांनी दुस-या कारखान्याची वाट धरली मात्र इतर ठिकाणीही पैसे कमीच मिळाले... वैजनाथ एकनाथ सहकारी साखऱ कारखान्यानं मात्र शेतक-यांचं हे म्हणणं फेटाळलंय. मात्र फायनल सेंटलमेंट झाली नाही हे कारखान्याचे अधिकारी खाजगीत मान्य करताए. मात्र अधिकृतपणे यावर बोलायला कुणीही तयार नाही...
औरंगाबाद जिल्ह्यात सध्या सर्वच कारखाने बंद असल्यामुळे नावावर मोठी जमीन असूनही सतरा विश्वे दारीद्र्य या लोकांच्या नशिबी आलंय. त्यामुळे जगायचं तरी कसं असा प्रश्न या शेतक-यांना पडलाय.