पाण्याअभावी... मोरांचा तडफडून मृत्यू!

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यात सात मोरांचा पाण्याअभावी तडफडून मृत्यू झालाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 16, 2013, 09:20 AM IST

www.24taas.com, उस्मानाबाद
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यात सात मोरांचा पाण्याअभावी तडफडून मृत्यू झालाय.
कळंब तालुक्यातल्या दुधाळ वाडी शिवारात सुभाष धोंगडे यांच्या शेतात हे सातही मोर मृतावस्थेत आढळले. वन विभागाच्या अधिका-यांनी घटना स्थळी धाव घेत पंचनामा केला. पाणी न मिळाल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय. जंगलातील पाणवठे आटल्यानं वन्यजीव शेताकडे धाव घेताहेत पण शेतातही पाणी नसल्यामुळे मोरासारख्या वन्य प्राण्यांना आपला जीव गमवावा लागतोय, हे धक्कादाय वास्तव आहे.

मराठवाड्यामध्ये दुष्काळाने आता किती गंभीर रुप धारण केलंय, हे यावरून चांगलंच लक्षात येतंय. यावर वेळीच उपाययोजना केली नाही तर आणखीही काही वन्य जीवांना प्राणास मुकावं लागेल.