अजित पवार म्हणजे महाराष्ट्राचे लालू- फडणवीस

सिंचन घोटाळ्यावरून पुन्हा एकदा विरोधकांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना टार्गेट केलंय. अजित पवार महाराष्ट्राचे लालू प्रसाद यादव असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केलीय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 7, 2013, 07:07 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबाद
सिंचन घोटाळ्यावरून पुन्हा एकदा विरोधकांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना टार्गेट केलंय. अजित पवार महाराष्ट्राचे लालू प्रसाद यादव असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.
आमचं सरकार आल्यावर अजित पवारांना जेलमध्ये टाकणार असल्याचंही वक्तव्य फडणवीसांनी केलंय. तर अजित पवारांना कुठल्या जेलमध्ये पाठवायच ते जनतेने ठरवावं असे सांगत गोपिनाथ मुंडेंनी अजितदादांना लक्ष्य केलं. भाजपच्या या टीकेवर राष्ट्रवादीनेही पलटवार केलाय.
या वक्तव्यांवर राष्ट्रवादी काँग्रसने प्रतिहल्ला केला आहे. “महाराष्ट्र म्हणजे बिहार नाही. भाजपमध्ये काहीजण येडीयुरप्पा बनण्याचं स्वप्न पाहत आहेत... पण आम्ही येडीयुरप्पा निर्माण होऊ देणार नाही”, असा प्रतिहल्ला राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी चढवलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.