राजीनाम्यानंतर... अजित पवार जनतेच्या दरबारात

उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अजीतदादा आज पुन्हा एकदा जनता दरबारात हजर झालेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 4, 2012, 09:12 AM IST

www.24taas.com, मुंबई
उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अजीतदादा आज पुन्हा एकदा जनता दरबारात हजर झालेत. आदिवासी विकास मंत्री बबनराव पाचपूते यांच्या शासकीय निवासस्थानी हा जनता दरबार भरलाय. मुख्य म्हणजे सकाळी साडेसात वाजताच म्हणजेच ठरलेल्या वेळेनुसारच हा जनता दरबार सुरु झाला.
उपमुख्यमंत्रिपद सोडल्यानंतर पहिल्यांदाच अजितदादा जनता दरबार घेतायेत. जनतेची संवाद साधण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न असल्याचं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे. त्यानुसार, दर गुरुवारप्रमाणे आजही अजितदादांनी लोकांची भेट घेतलीय. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रं हातात घेतल्यानंतर अजित पवार यांनी जनता दरबार घेण्यास सुरूवात केली होती. आता मंत्रिपदावर नसतानाही दादांनी मात्र ही प्रथा कायम ठेवलीय. या जनता दरबाराला लोकांनीही चांगला प्रतिसाद दिला. आपली गाऱ्हाणी, आपले प्रश्न त्यांनी अजित पवार यांच्यासमोर ठेवली आहेत.
मंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतरही मंत्र्यांवर अंकुश ठेवण्याचा दादांचा प्रयत्न काल झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत स्पष्ट दिसून आला होता. आता जनतेची गाऱ्हाणी ऐकून जनसंपर्क कायम ठेवण्याचा दादांचा हा प्रयत्न केलाय.