माशांचे तेल अनेक रोगांवर गुणकारी

माशांचे तेल अनेक रोगांवर गुणकारी ठरत आहे. माशांच्या तेलाबाबत करण्यात आलेल्या अभ्यासावरून स्पष्ट झाले आहे. आहार तज्ज्ञांच्या मते हृदयरोग, गाठी आणि अंध होण्यापासून माशांचे तेल वाचवते. माशांचे तेल चांगला आहार आहे.

Updated: Aug 8, 2012, 02:33 AM IST

www.24taas.com, लंडन

माशांचे तेल अनेक रोगांवर गुणकारी ठरत आहे. माशांच्या तेलाबाबत करण्यात आलेल्या अभ्यासावरून स्पष्ट झाले आहे. आहार तज्ज्ञांच्या मते हृदयरोग, गाठी आणि अंध होण्यापासून माशांचे तेल वाचवते. माशांचे तेल चांगला आहार आहे.

'डेली मेल'च्या वृत्तानुसार अभ्यासकर्त्यांनी केलेल्या संशोधनानुसार माशांचे तेल लहान मुलांसाठी आणि गर्भवती महिलांसाठी रोग प्रतिबंधक म्हणून उपयुक्त ठरते.

लंडनमधील 'संत जॉर्ज हॉस्पिटल'मधील आहार तज्ज्ञ कॅथरिन कॉलिन्स यांच्या म्हणण्यानुसार, माशांचे तेल प्रभावशाली रोगरोधी आहे. पायांमध्ये होणाऱ्या वेदना दूर करण्यासाठी आणि शारिरीक थकावट दूर करण्यास मदत करते. अभ्यासकांच्या मते हृदयरोगासाठी हे तेल अधिक फायदेशी ठरते. या तेलाच्या सेवनामुळे हृदयसंबंधी आजार दूर होतात. त्यामुळे माशांचे तेल हे अनेक आजारांवर गुणकारी ठरले आहे.