विंडीज फलंदाजी बहरात, ब्राव्होचे शतक

मुंबईत वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशीही विंडीजने दमदार सुरूवात करून तीन बाद ४१६ रन्स केल्या.

Updated: Nov 23, 2011, 07:20 AM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

मुंबईत वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशीही विंडीजने  दमदार सुरूवात करून तीन बाद ४१९ रन्स केल्या.  दुसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात डॅरेन ब्राव्होच्या (१२७) दमदार शतकाच्या आणि पॉवेलच्या (५४) अर्ध शतकाच्या  जोरावर विंडीजने ४१९  वेस ओलांडली आहे.

 

ब्राव्होने आपल्या कसोटी कारकीर्दीतील तिसरं शतक झळकावलं.  ब्राव्हो आणि पॉवेल या जोडीने भारतीय गोलंदाजीची पिस काढली आहेत. या जोडीने १७० रन्सची भागीदारी केली आहे. त्याआधी ईशांत शर्माने किर्क एडवर्डसला बाद केलं. ईशांतच्या गोलंदाजीवर एडवर्डस धोनीकडे एक सोपा कॅच देऊन माघारी परतला.

एडवर्डसने ८६ धावांची खेळी केली. ब्राव्हो आणि एडवर्डसनी तिसऱ्या विकेटसाठी १६४ धावांची भागीदारी रचली. मात्र दुसऱ्या एण्डकडून डॅरेन ब्राव्होनं एक बाजू लावून धरली आहे.