मुंबई इंडियन्सने रॉयल्सला हरवून दाखवले...

मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सपुढे विजयासाठी १९८ रनच आव्हान ठेवलं आहे. मुंबईने आज तडाखेबंद खेळ केला, आणि त्यामुळे मुंबई इंडियन्सने मोठी मजल मारली. २० ओव्हरमध्ये १९७ रन केल्या.

Updated: Apr 11, 2012, 11:48 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

 

मुंबई इंडियन्सने पोलार्ड आणि रायडू  यांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सवर २७ रननी दणदणीत विजय मिळविला. मुंबई इंडियन्सने विजयासाठी ठेवलेल्या १९८ रनचे आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेला राजस्थान रॉयल्स संघाला केवळ १७० रनपर्यंतच मजल मारता आली.

 

मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सपुढे विजयासाठी १९८ रनच आव्हान ठेवलं आहे. मुंबईने आज तडाखेबंद खेळ केला, आणि त्यामुळे मुंबई इंडियन्सने मोठी मजल मारली. २० ओव्हरमध्ये १९७ रन  केल्या.

 

केरॉन पोलार्डने चार सिक्स आणि सहा फोरसह फक्त ३३ बॉलमध्ये ६४ धावांची दणदणीत खेळी केली. मुंबईला धावांचा डोंगर उभारण्यात पोलार्डच्या खेळीची विशेष मदत झाली. त्याला रायडूने मोलाची साथ दिली. रायडूने त्याच्या खेळीत तीन सिक्स ठोकले. रायडूने ३२ बॉलमध्ये नाबाद ४७ रन केले.

 

तत्पूर्वी रिचर्ड लेवी २२ बॉलमध्ये २९ रन करून आऊट झाला. हॉगने त्याला बाद केले. रोहित शर्माला आज काही विशेष करता आले नाही. रोहित शर्मा २१ रनवर आऊट  झाला.  याआधी टी. सुमन बाद झाला. सूमनला (१०) त्रिवेदीने आऊट केले.