24taas.com, सिडनी
सिडनी टेस्टमधील आजचा पहिला दिवस गाजवला तो बॉलर्सने. आजच्या संपूर्ण दिवसात टेस्टच्या पहिल्याच दिवशी १३ विकेट गेल्या. त्यामुळे टेस्टमधील चुरस वाढणार हे नक्की सिडनी टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियानं पहिल्या दिवसअखेर ३ विकेट्स गमावून ११६ रन्सपर्यंत मजल मारली आहे. कांगारु टीम इंडियाच्या अजून ७५ रन्स पिछाडीवर आहेत. कॅप्टन मायकल क्लार्क ४७ रन्सवर आणि रिकी पॉन्टिंग ४४ रन्सवर नॉटआऊट आहेत. भारताकडून झहीर खाननं ३ विकेट् घेतल्या.मात्र इतर बॉलर्सना कांगारु बॅट्समनना आऊट करण्यात अपयश आलं. तत्पूर्वी, टीम इंडयाला १९१ रन्सवर ऑलआऊट केल्यानंतर ऑस्ट्रेलियाची सुरुवातही अतिशय खराब झाली.
झहीर खाननं कांगारुंच्या दोन बॅट्समनना आऊट केलं. त्यानं डेव्हिड वॉर्नरला ८ रन्सवर तर शॉन मार्शला शून्यावर आऊट केलं. मार्श आणि वॉर्नर आऊट झाल्यावर ओपनर एड कोवानही १६ रन्सवर पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र, त्यानंतर क्लार्क आणि पॉन्टिंग या अनुभवी जोडीनं कांगारुंची आणखी पडझड होऊ दिली नाही. आता टेस्टच्या दुसऱ्या दिवशी या धोकादायक जोडीला आऊट करण्यावर टीम इंडिया भर देणार हे नक्की.
सिडनी टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियानं टीम इंडियाला १९१ रन्सवर गुंडाळलं. भारताकडून कॅप्टन महेंद्रसिंग धोनीननं नॉटआऊट ५७ रन्सची इनिंग खेळली. सचिन तेंडुलकरनं ४१ रन्स केले. या दोघांव्यतिरीक्त भारताच्या एकाही बॅट्समनला चमकदारा कामगिरी करता आली नाही. ऑस्ट्रेलियाकडून जेम्स पॅटिन्सननं ४ विकेट्स घेतल्या तर पीटर सिडल आणि बेन हिलफेनहॉसनं प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या. दरम्यान, सचिनची महासेंच्युरी पुन्हा एकदा हुकली. आपल्या आवडत्या सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर त्याला महासेंच्युरी झळकावता आली नाही. आता त्याच्या चाहत्यांना सेंच्युरीच्या सेंच्युरीची आणखी वाट पाहावी लागणार आहे. टीम इंडियाच्या बॅट्समननी मेलबर्नप्रमाणे या मॅचमध्येही निराशाच केली.
[jwplayer mediaid="22904"]