धोनीच्या हस्ते 'आनंदवन'ला तीन कोटींचा धनादेश

आयपीएलमध्ये व्यस्त असलेल्या महेंद्रसिंग धोनीला एका वेगळ्याच रुपात पाहण्याचा योग पुणेकरांना मिळाला. क्रिकेटमधील वस्तूंचा लिलाव करण्यात आला. या लिलावातून जमा झालेली रक्कम धनादेशाच्या रुपात धोनीच्या हस्ते बाब आमटेंच्या आनंदवन या संस्थेला देण्यात आला.

Updated: Apr 14, 2012, 09:25 PM IST

www.24taas.com, पुणे

आयपीएलमध्ये व्यस्त असलेल्या महेंद्रसिंग धोनीला एका वेगळ्याच रुपात पाहण्याचा योग पुणेकरांना मिळाला. क्रिकेटमधील वस्तूंचा लिलाव करण्यात आला. या लिलावातून जमा झालेली रक्कम धनादेशाच्या रुपात धोनीच्या हस्ते बाब आमटेंच्या आनंदवन या संस्थेला देण्यात आला.

कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी सध्या आयपीएलमध्ये एकामागून एक मॅच खेळण्यामध्ये व्यस्त आहे. मात्र, आपल्या व्यस्त कार्यक्रमातील थोडासा वेळ त्यानं सामाजिक कार्यासाठी दिला. पुण्य़ामध्ये झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात महेंद्रसिंग धोनीच्या हस्ते बाबा आमटे यांच्या आनंदवन संस्थेला तीन कोटी रुपयांचा धनादेश देण्यात आला.

ABIL फाऊंडेशननं महेंद्रसिंग धोनीच्या क्रिकेट वस्तूंचा लिलाव केला होता. या लिलावातून मिळालेली रक्कम या संस्थेला देण्यात आली. यावेळी धोनीनं स्वाक्षरी केलेली बॅटही आनंदवनला देण्यात आली. एक क्रिकेट म्हणून नाही तर महेंद्रसिंग धोनी म्हणून या कार्यक्रमाला आलो असल्याचं त्यानं सांगितलं. आनंदवन करत असलेल्या कार्याचं कौतुक करायलाही तो यावेळी विसरला नाही.

टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कॅप्टन असलेल्या महेंद्रसिंग धोनीची सामाजिक कार्याचाही बाजू या निमित्तानं चाहत्यांना पाहायला मिळाली. त्याच्या या कार्यामुळे मैदानाप्रमाणेच मैदानाबाहेरही आपण हिट असल्याचं कॅप्टन धोनीनं पुन्हा एकदा दाखवून दिलं.