टीम इंडिया अडचणीत

मेलबर्न टेस्टमध्ये बॅट्समनच्या कामगिरीमुळे टीम इंडियाला पराभव सहन करावा लागला होता आणि सिडनी टेस्टमध्येही परिस्थिती फारशी वेगळी दिसली नाही. बॅट्समननी पुन्हा एकदा निराशा केली आणि टीम इंडिया चांगलीच अडचणीत सापडली.

Updated: Jan 3, 2012, 04:54 PM IST

www.24taas.com, सिडनी

 

मेलबर्न टेस्टमध्ये बॅट्समनच्या कामगिरीमुळे टीम इंडियाला पराभव सहन करावा लागला होता आणि सिडनी टेस्टमध्येही परिस्थिती फारशी वेगळी दिसली नाही. बॅट्समननी पुन्हा एकदा निराशा केली आणि टीम इंडिया चांगलीच अडचणीत सापडली.

 

सिडनीत टीम इंडियाच्या आघाडीच्या बॅट्समननी पुन्हा एकदा निराशा केली. भारताच्या या सर्वात अनुभवी बॅट्समनना काहीच कमाल करता आली नाही. सिडनी टेस्टमध्ये या बॅट्समननी केवळ पिचवर हजेरी लावण्याच काम केलं.मेलबर्न टेस्टमध्ये याच बॅट्समनच्या खराब कामगिरीमुळे भारताला  लाजिरवाणा पराभव सहन करावा लागला होता. विजयाची संधी असूनही बॅट्समनच्या हाराकिरीमुळे भारतानं मेलबर्न टेस्ट गमावली. आणि सिडनी टेस्टमध्येही तेच चित्र दिसून आलं. महेंद्रसिंग धोनी आणि सचिन तेंडुलकरचा अपवाद वगळता एकाही बॅट्समननी पिचवर उभं राहण्याचा प्रयत्न केला नाही.

 

एकीकडे बॉलर्स सुपरहिट ठरत असतांना बॅट्समन मात्र, फ्लॉप ठरतायत. गौतम गंभीर तर फॉर्मसाठी झगडतोय. मेलबर्न आणि आता सिडनीतही तो अपयशी ठरला. व्हेरीव्हेरी स्पेशल लक्ष्मण ऑस्ट्रेलियात नेहमीच हिट ठरतो. मात्र या दौ-यात त्यालाही सुर गवसलेला नाही. त्याचा हरपलेला फॉर्म भारतासाठी चिंतेचा विषय बनला आहे. युवा विराट कोहलीलाही आपली वेगळी छाप पाडता आलेली नाही. दिग्गज बॅट्समन फ्लॉप ठरल्यानं कॅप्टन धोनीची डोकेदुखी आणखी वाढली आहे.