आयपीएल बंद करू नका- विलासराव

शाहरूखला वानखेडेवर पाच वर्षांची बंदी घालण्याची घोषणा करणारे एमसीएचे अध्यक्ष विलासराव देशमुख यांनी आयपीएल बंदीला मात्र विरोध दर्शविला आहे. आयपीएल नवोदित खेळाडूंसाठी एक व्यासपीठ आहे.

Updated: May 20, 2012, 01:30 PM IST

www.24taas.com, मुंबई

शाहरूखला वानखेडेवर पाच वर्षांची बंदी घालण्याची घोषणा करणारे एमसीएचे अध्यक्ष विलासराव देशमुख यांनी आयपीएल बंदीला मात्र विरोध दर्शविला आहे. आयपीएल नवोदित खेळाडूंसाठी एक व्यासपीठ  आहे.

असं सांगत यात घडणाऱ्या दुर्दैवी घटनांवर बीसीसीआयनं बंधनं आणण्यासाठी कडक नियमावली करावी असा सल्ला विलासरावांनी दिला आहे. शाहरूखच्या बंदीविषयी एमसीएचा निर्णय योग्य असल्याचंही विलासरावांनी म्हंटल आहे. त्यामुळे आयपीएल बंद करावं असा सगळ्याच स्तरातून होणारी ओरड विलासरावांना मात्र पटलेली नाही.

आयपीएल मॅचनंतर सुरु होते मस्ती, बेधुंद खेळाडू, बेफिकीर वर्तन आणि मद्याची झिंग. हे सगळं पाहिलं की आयपीएलच्या मायाजालात सहभागी झालेल्या चेहऱ्यांचा संबंध जन्टलमेन्स गेम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रिकेटशी असेल असं आपण म्हणू शकू का? असा प्रश्न सामान्यांना पडतो याला विलासराव काय उत्तर देणार आहेत?