आयपीएलची धमाल, अजिंक्य राहाणेची कमाल

टी-20 महासंग्रामात मुंबईचा अजिंक्य रहाणेने आपल्या जबरदस्त कामगिरीने सा-यांचीच वाहवा मिळवली. राजस्थानकडून खेळणा-या अजिंक्यने या सीझनमधील पहिली-वहिली सेंच्युरी झळकावली आणि राजस्थानसाठी सर्वाधिक रन्सदेखील केल्या.

Updated: May 30, 2012, 12:09 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

टी-20 महासंग्रामात मुंबईचा अजिंक्य रहाणेने आपल्या जबरदस्त कामगिरीने सा-यांचीच वाहवा मिळवली. राजस्थानकडून खेळणा-या अजिंक्यने या सीझनमधील पहिली-वहिली सेंच्युरी झळकावली आणि राजस्थानसाठी सर्वाधिक रन्सदेखील केल्या.

 

 

टी-20 महासंग्रामात काही नवे चेहरे समोर आले तर काही दिग्गज अक्षरक्ष: फ्लॉप ठरले. या सा-यांमध्ये आपला मुंबईचा अजिंक्य एखाद्या ता-याप्रमाणे चमकला. मूळचा मुंबईचा असलेला मात्र राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा अजिंक्य रहाणेचा झंझावात सा-यांना पहायला मिळाला. राजस्थानकडून सर्वाधिक रन्स या अजिंक्यने केल्या आहेत. सुरूवाताच्या काही मॅचेसमध्ये अजिंक्यनेच ऑरेंज कॅपवर कब्जा केला होता. मात्र राजस्थान रॉयल्सच आव्हान लीग राऊंडमध्येच संपुष्टात आल आणि अजिंक्यच्या रन्सला लगाम लागला.

 

अजिंक्यने 16 मॅचेसमध्ये 560 रन्स केल्या आहेत. यामध्ये 1 सेंच्युरी आणि 3 हाफ सेंच्युरी त्याने झळकावली आहे. 103 नॉट आऊट रन्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. अजिंक्यने 40च्या सरासरीने या रन्स केल्या आहेत.

 

23 वर्षीय अजिंक्यने टीम इंडियामध्ये 2011मध्ये इंग्लंडविरूद्धच्या डेब्यू केला. भारताकडून खेळताना अजिंक्यने 11 वन-डेमध्ये 340 रन्स केल्या आहेत. मात्र या सीझनमध्ये टी-20 महासंग्रामातील पहिली सेंच्युरी अजिंक्यने झळकावली आणि अजिंक्यला एक वेगळीच ओळख मिळाली. विशेष म्हणजे अजिंक्यने ही सेंच्युरी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरूद्ध त्यांच्याच होम ग्राऊंडवर झळकावली. आयपीएलमध्ये सुरूवातीला मुंबई इंडियन्सकडून खेळणारा अजिंक्य या सीझनमध्ये राजस्थानकडून खेळला आणि त्याने आपला झंझावात निर्माण केला. आता अजिंक्यचा हा झंझावात असाच कायम राहो आणि टीम इंडियासाठीदेखील त्याने अशाच झंझावाती इनिंग कराव्यात अशीच आशा त्याचे चाहते बाळगून असतील.