www.24taas.com, लंडन
ऑलिम्पिकमध्ये लिएंडर पेस खेळणार की नाही? याबाबत अनेक शक्यता वर्तवल्या जात होत्या. मात्र, पेसनं लंडन ऑलिंपिकमध्ये खेळणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
‘इंग्लंडमध्ये खेळायला आलो आहे राजकारण करायला नाही’, असं त्यानं म्हटलं आहे. जवळपास दोन दशकाहून अधिक काळ पेस भारतीय टेनिसची अविरत सेवा करतोय. यापुढेही देशासाठी चांगली कामगिरी करण्यावर भर देईन, असं त्यानं म्हटलंय. पेस ऑलिंपिकमध्ये टेनिस डबल्समध्ये युवा विष्णु वर्धनबरोबर तर मिक्स डबल्समध्ये सानिया मिर्झाबरोबर भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे.
जागतिक रँकिंगमध्ये २०६व्या क्रमांकावरील विष्णूसह दुहेरीत खेळण्याबाबत पेसनं आपली काहीही तक्रार नसल्याचं म्हटलंय. 'विष्णूचं हे पहिलंच ऑलिम्पिक आहे. त्यामुळे मी त्याला प्रत्येक वेळी मदत करण्याचा प्रयत्न करेन. विष्णू हुशार आहे. पण विष्णू विम्बल्डनमध्ये खेळलेला नसल्यानं त्याची तयारी मीच करून घेणार आहे. तो माझ्यासोबत खेळत असल्यानं हे माझं कर्तव्यच आहे,' असं पेसनं म्हटलंय. भूपती, बोपण्णा आणि सानियानंही त्याच्यासोबत खेळण्यास नाकं मुरडल्यानं तो दु:खी झाला होता.
.