आता 'ट्विटर' या लोकप्रिय सोशल नेटवर्किंग संकेतस्थळाने शुक्रवारपासून नवीन रूप धारण केले आहे.
सोशल नेटवर्किंग साईट्समध्ये लोकप्रिय होण्यासाठी आणि नेटिझन्सना आकर्षित करण्यासाठी सारखी चढाओढ लागलेली असते. अशातच आता 'ट्विटर' या लोकप्रिय सोशल नेटवर्किंग संकेतस्थळाने ९ डिसेंबर २०११पासून नवीन रूप धारण केले आहे.
गुगलने युवकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन फंडे शोधले आहेच. त्यानुसार वेबपेजमध्ये सातत्याने बदल गुगल करत असते. आता या बदलात ट्विटर' ने एक पाऊल पुढे टाकून आपणही मागे नसल्याचे दाखवून दिले आहे.
ट्विटर' ने कनेक्टा आणि मी असे दोन टॅब नवीन रचनेत वाढविण्यात आले आहेत तर होम हा टॅब कायम आहे. मी' टॅबमध्ये आपले फॉलोअर्स थेट ट्विट करू शकणार आहेत तर कनेक्टन' मध्ये आपले ट्विट कोणी पुन्हा शेअर केले ते दिसणार आहे.