आज वाजतोय 'गुगल' सिंथेसायजर

रॉबर्ट ऑर्थर “बॉब” मूग यांच्या ७८व्या वाढदिवसानिमित्त गुगल डूडलने आपल्या हटके शैलीत गुगल सजवले आहे. आज चक्क गूगल डूडलने गुगलवर व्हर्च्युअल मूग सिंथेसायजर उपलब्ध केला आहे. आणि ते नुसतंच चित्र नाही, तर तो वाजवताही येतोय.

Updated: May 23, 2012, 10:38 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

रॉबर्ट ऑर्थर “बॉब” मूग यांच्या ७८व्या वाढदिवसानिमित्त गुगल डूडलने आपल्या हटके शैलीत गुगल सजवले आहे. आज चक्क गूगल डूडलने गुगलवर व्हर्च्युअल मूग सिंथेसायजर उपलब्ध केला आहे. आणि ते नुसतंच चित्र नाही, तर तो वाजवताही येतोय.

 

युजर्स या सिंथेसायजरवर माऊसने क्लिक करून किंवा टचपॅड असल्यास होताने वाजवू शकतात. एवढंच नव्हे, तर या सिंथेसायजरमधून अधिक चांगला आणि हवा असलेला ध्वनी मिळावा यासाठी लागणारी सेंटिंग्ससुद्धा उपलब्ध करून दिली आहेत. एवढंच नव्हे, तर आपण वाजवलेलं संगीत रेकॉर्ड करून ठेवत पुन्हा पुन्हा ऐकायची सोयही गुगल डूडलने केली आहे. तुम्ही तयार केलेलं संगीत तुम्हाला इतरांनी ऐकावं असं वाटत असेल, तर त्यासाठीही गगुगल डूडलने सोय करून ठेवली आहे. रेकॉर्ड केलेलं संगीत तुम्ही ‘गुगल प्लस’द्वारे शेअर करू शकतात. तो ही ऑप्शन तुम्हाला इथे मिळतो.

 

मात्र, अशा प्रकारचं व्हर्च्युअल वाद्य गुगलने यापूर्वीही निर्माण केलं होतं. ९ जून २०११ रोजी प्रसिद्ध अमेरिकन गिटारीस्ट, गीतकार लेस पॉल यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त गुगलवर वाजवता येईल अशी गिटार स्क्रीनवर पाहायला मिळली होती.

 

रॉबर्ट मूग यांनी मूग सिंथेसायजर तयार केला होता. हे पहिलं वहिलं विद्युतक्षमतेवर वाजवलं जाणारं वाद्य होतं. यातून वेगवेगळ्या वाद्यांचे आवाजही काढता येत. या वाद्याने संगीतक्षेत्रात अद्भुत कामगिरी केली.