प्रस्थापितांना मतदारांचा दे धक्का...

राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुकीत काँग्रेसने २५ तर राष्ट्रवादीने ३२ नगरपालिकेत बहुमत प्राप्त केलं. सेना-भाजप युतीला फक्त ७ नगरपालिकेत सत्ता मिळवता आली तर स्थानिक आघाड्यांनी १६ ठिकाणी बहुमत मिळवलं आहे. पाच नगरपालिकात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे.

Updated: Dec 12, 2011, 11:30 AM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई 

राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुकीत काँग्रेसने २५ तर राष्ट्रवादीने ३२ नगरपालिकेत बहुमत प्राप्त केलं. सेना-भाजप युतीला फक्त ७ नगरपालिकेत सत्ता मिळवता आली तर स्थानिक आघाड्यांनी १६ ठिकाणी बहुमत मिळवलं आहे. पाच नगरपालिकात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे.

राज्यभरात नगरपालिकांचे निकाल धक्कादायक लागले आहेत. मतदारांनी प्रत्येक ठिकाणी मातब्बर प्रस्थापितांना नाकारल्याचं स्पष्ट झालं आहे. सिंधुदुर्गात नारायण राणेंच्या दहशतीला मतदारांनी मतपेटीतून चोख उत्तर दिलं आहे. सावंतवाडीत तर राष्ट्रवादीने १७ पैकी १७ जागा मिळवण्याचा पराक्रम गाजवला आहे. वेंगुर्ल्यातही राणेंचा पाडाव झाला आहे.

 

कराडमध्ये दस्तूरखुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या पायाखालची ‘पृथ्वी’ सरकली आहे. आमदार बाळासाहेब पाटील गटाने कराड नगरपालिकेवर झेंडा फडकावला. कराडवर पारंपारिक दृट्या पी.डी.पाटील घराण्याचे वर्चस्व कायम राहिले आहे.

 

पंढरपुरात सुधाकर परिचारकांच्या अनेक वर्षांच्या वर्चस्वाला तडा गेला आहे, तिथे आमदार भालके गटाने नगरपालिका ताब्यात घेतली आहे. आमदार भालके गटाला १८ तर सुधाकर परिचारक गटाला १५ जागा मिळाल्या.

खेडमध्ये रामदार कदमांना देखील मतदारांनी तडाखा देत नगरपालिका मनसेच्या ताब्यात दिली आहे. मनसेने आपले खातं खोललं आहे. राज ठाकरेंच्या हाती नगरपालिका आल्याने त्यांना त्यांच्या विकासाची बल्युप्रिंट प्रत्यक्षात उतरवण्याची संधी मतदार राजाने त्यांना दिली आहे. खेड नगरपालिकेच्या कारभाराकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असेल.

नांदेडमधील उमरीतही अशोक चव्हाणांना मतदारांनी असाच झटका दिला आहे. राज्यात शिवसेना-भाजपा आणि रिपब्लिकन महायुती काँग्रेस –राष्ट्रवादी काँग्रेसला पाणी पाजेल असा अंदाज होता.

 

एकीकडे अण्णा हजारेंच्या आंदोलनाने बॅकफूटला गेलेली काँग्रेस, तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या असंतोषाच्या उद्रेकाने काँग्रेस-राष्ट्रवादीचे पानीपत होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. अर्थात निकालांनी ग्रामीण महाराष्ट्र आणि शहरी महाराष्ट्र यातील अंतर दाखवून दिलं आहे. नगरपालिकेच्या निवडणुका जिंकण्याचा फंडा वेगळा असतो हेही पुन्हा एकदा सिध्द झालं आहे. त्यामुळेच राज्यभरातील नगरपालिकांच्या निवडणुकीत मात्र काँग्रेस राष्ट्रवादीने विजय संपादन करत मोठा धक्का दिला आहे.

 

अर्थात याला अपवाद आहेच बारामतीवर ताबा ठेवण्यात अजितदादा पवारांना आणि रोहा नगरपालिकेची सत्ता कायम ठेवण्यात सुनील तटकरेंना यश आलं आहे.

मावळ गोळीबारनंतर पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या तळेगाव नगरापलिका निवडणुकीत तळेगावकरांनी या मुद्द्याकडे दुर्लक्ष करत भाजपच्या हातातील सत्ता आघाडीकडे सोपवली. गोळीबारानंतर भाजपने हा निवडणुकीचा मुद्दा केला होता. परंतु अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मुसंडी मारून भाजपला धक्का बसला आहे.

मावळ गोळीबारनंतर पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या तळेगाव नगरापलिका निवडणुकीत तळेगावकरांनी या मुद्द्याकडे दुर्लक्ष करत भाजपच्या हातातील सत्ता आघाडीकडे सोपवली. गोळीबारानंतर भाजपने हा निवडणुकीचा मुद्दा केला होता. परंतु अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मुसंडी मारून भाजपला धक्का बसला आहे.

 

तळेगावमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने १५ जागा जिंकून सत्ता मिळवली. भाजपला मात्र फक्त ८ जागा जिंकता आल्या. इंदापूर नगरपालिकेत काँग्रेसला निसटता विजय मिळाला असून, हर्षवर्धन पाटील यांना विचार करायला लावणारा हा निकाल आहे. काँग्रेसला ९, तर राष्ट्रवादी ८ जागा मिळाल्या आहेत. आळंदी नगरपालिकेत अपक्ष उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. अपक्षांनी ६ जागांवर विजय मिळवला असतून काँग्रसप्रणीत शहरविकास आघाडी – ५ , राष्ट्रवादी – १ जागेवर विजय मिळवला आहे.

 

सासवड नगरपालिकेत जनमत विकास आघाडी – १३ जागा जिंकून विजयी झाली आहे. तर सेनेला १ आणि राष्ट्रवादी ३ जागेवर विजय मिळवता आला आहे. जेजुरी नगरपालिकेत राष्ट्रवादी आघाडी – १२ जागा जिंकून विजय मिळवला आहे. तर काँग्रेसला ५ जागेवर समाधान मानावे लागले आहे. तळेगावमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने १५ जागा जिंकून सत्ता मिळवली. भाजपला मात्र फक्त ८ जागा जिंकता आल्या. दुसरीकडे जुन्नर नगरपालिकेत १७ पैकी ९ जागा जिंकून शिवसेनेने सत्ता मिळवली आहे. राष्ट्रवादीला ६ जागा मिळाल्या असून, मनसेने २ जागा ज