नाही घेणार.. माथेफिरू संतोष मानेचं वकीलपत्र

पुणेकरांचा गुन्हेगार संतोष मानेला तीन फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. त्याचबरोबर त्याचं वकीलपत्र घ्यायला वकिलांनी नकार दिला आहे.

Updated: Jan 26, 2012, 08:52 PM IST

www.24taas.com, पुणे

 

पुणेकरांचा गुन्हेगार संतोष मानेला तीन फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. त्याचबरोबर त्याचं वकीलपत्र घ्यायला वकिलांनी नकार दिला आहे. आज त्याला कोर्टात हजर केलं असता, त्याच्या चेहऱ्यावर अजिबात पश्चाताप नव्हता.

 

आठ निष्पाप पुणेकरांचा बळी घेणारा आणि ३२ पुणेकरांना जखमी करणारा क्रूरकर्मा संतोष माने हा स्वारगेट डेपोला एसटी ड्रायव्हर ड्युटीवर नसताना डेपोतून एसटी पळवून नेऊन संपूर्ण पुण्यात थैमान घातलं. संतोष मानेवर ३०२ खून करणं, ३०७ खुनाचा प्रयत्न करणं, ३२६ गंभीर दुखापत, ३२४ दुखापत करणं, ३८१ नोकराकडून मालमत्तेची चोरी अशा कलमांनुसार   गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी त्याला शिवाजीनगर कोर्टात हजर केलं असता त्याला १ आठवड्याची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

संतोष माने हा सामान्य माणसाचा शत्रू असल्याचं सांगत त्याचं वकीलपत्र न स्वीकारण्याचा निर्णय पुणे बार असोसिएशननं घेतला आहे.  संतोष मानेनं केलेलं हे कृत्य फक्त पुण्यालाच नाही तर संपूर्ण देशाला हादरवणारं आहे. त्याला कोर्टात हजर केलं त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर पश्चातापाचे कुठलेही भाव नव्हते. अशा नराधमाला कठोरात कठोर शिक्षा देण्याची पुणेकरांची मागणी आहे.