कारखाना निवडणुकीत जादूटोणा?

कोल्हापूर जिल्ह्यातल्या हमीदवाडा सहकारी साखर कारखान्याची आज निवडणूक होतेय. या पार्श्वभूमीवर सदाशिव मंडलिक गट आणि हसन मुश्रीफ गटामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत.

Updated: Jun 12, 2012, 12:55 PM IST

www.24taas.com, कोल्हापूर

 

कोल्हापूर जिल्ह्यातल्या हमीदवाडा सहकारी साखर कारखान्याची आज निवडणूक होतेय. या पार्श्वभूमीवर सदाशिव मंडलिक गट आणि हसन मुश्रीफ गटामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत.

 

हमीदवाडा गावात चार मांत्रिकांना गावक-यांनी पकडलं. त्यांच्याकडे कुंकू लावलेले तांदूळ आणि गावांची यादी ताब्यात घेण्यात आली. या मांत्रिकांना हसन मुश्रीफ गटाच्या लोकांनीच पाठवल्याचा आरोप सदाशिव मंडलिक गटानं केलाय.

 

जमावानं या मांत्रिकांच्या गाडीचीही तोडफोड केली. एकूणच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटात राजकीय वातावरण तापलंय.

 

[jwplayer mediaid="118791"]