मालेगावात पुन्हा 'कांदोलन'

कांदा दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सुरु केलेलं आंदोलनं आता चांगलचं पेटलंय. खासदार राजू शेट्टींसह ३ ते ४ हजार शेतकऱ्यांना अटक करण्यात आलीय. मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये आंदोलनकर्ते जमलेत.

Updated: Apr 17, 2012, 08:09 PM IST

www.24taas.com, नाशिक

 

कांदा दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सुरु केलेलं आंदोलनं आता चांगलचं पेटलंय. खासदार राजू शेट्टींसह ३ ते ४ हजार शेतकऱ्यांना अटक करण्यात आलीय. मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये आंदोलनकर्ते जमले आहेत. संघटनेनं टेहेरे गावाजवळ रास्ता रोको सुरू केल्यानंतर पोलिसांनी दडपशाही मार्गाने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप  स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला होता. पोलिसांनी आग्रा महामार्गावर असलेल्या संपूर्ण टेहरे गावाला वेढा देऊन सर्व रस्त्यावर पोलिसांनी पहाराही ठेवला होता. त्याचबरोबर संघटनेच्या कार्यकर्त्यांची धरपकडही सुरू केली होती.

 

[jwplayer mediaid="84661"]