असं काही तर फक्त पुण्यातच होऊ शकतं! खाणाऱ्यांची गर्दी रोखण्यासाठी ठेवले महिला बाऊन्सर

पुणे तिथं काय उणे.. याची प्रत्यक्षात प्रचिती आली आहे. खवय्यांचे अतिक्रमण होतंय म्हणून महिला बाऊन्सर ठेवण्यात आले आहेत.

वनिता कांबळे | Updated: Jun 17, 2024, 10:16 PM IST
असं काही तर फक्त पुण्यातच होऊ शकतं! खाणाऱ्यांची गर्दी रोखण्यासाठी ठेवले महिला बाऊन्सर title=

Pune News :  पुण्यात कधी काय होईल याचा मात्र नेम नाही ...कारण खवय्यांचा अतिक्रमण होतंय म्हणून चक्क सोसायटीने महिला बाऊन्सर ठेवल्या आहेत त्यामुळे खाद्य पदार्थ घेणाऱ्या ग्राहकाला महिला बाऊन्सर चा सामना कराव लागत आहे. काय आहे हा नेमका प्रकार समजल्यावर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. 

पुण्यातील सिंहगड रोडवर असलेल्या नवसह्याद्री सहकारी गृहनिर्माण सोसायटीत हा प्रकार पहायला मिळाला. 35 एकरवर वसलेल्या नवसह्याद्री सहकारी गृहनिर्माण सोसायटीत 277 बंगले आहे. मात्र, सोसायटीने काही भाग हा दुकानांसाठी भाडेतत्त्वावर देण्यात आला आहे मात्र याच दुकानदार आणि हॉटेलच्या अतिक्रमणामुळे सोसायटी धारकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने सोसायटी धारकांनी महिला बाऊन्सर ठेवून जागा मोकळी करण्यात येत आहे. दुकानदार आणि हॉटेल यांचे अतिक्रमण होऊ नये म्हणून नवसह्याद्री सोसायटीने महिला बाउन्सर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

मात्र, खवय्यांना सोसायटी आणि दुकानदार यांच्या वादामुळे दोन घास आनंदाने खाणाऱ्या ग्राहकाला  महिला बाउन्सर यांचा पहिला सामना करावा लागतो . सोसायटीच्या मोकळ्या जागेवर अतिक्रमण करून या खाद्य दुकानदारांनी आपले अतिक्रमण टाकून चक्क खवय्यांची गर्दी केली आणि याचा त्रास हा चक्क या सोसायटीतील सभासदांना होऊ लागला आणि सोसायटीने सभासदांची मीटिंग घेत मोकळ्या जागेतील अतिक्रमण काढून चक्क बाऊन्सरच नेमले आहे. यामुळे भाडेकरू आणि सोसायटीतील वादाचा फटका या खाद्य दुकानदारांकडून येणाऱ्या ग्राहकांना होत असल्याचा पाहायला मिळत आहे.यामुळे शहरात अश्या पद्धतीने सोसायटीच्या मोकळ्या जागेत बाऊन्सर ठेवण्याची ही पहिलच घटना असल्याचं सांगितल जात आहे.