राळेगण ते झेडपी व्हाया राष्ट्रवादी

राळेगण सिद्धीचे सरपंच जयसिंग मापारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणार आहेत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी मापारींना राष्ट्रवादी कडून निवडणूक लढवण्यास परवानगी दिली आहे.

Updated: Jan 9, 2012, 02:49 PM IST

www.24taas.com, अहमदनगर

 

 राळेगण सिद्धीचे सरपंच जयसिंग मापारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणार आहेत. ज्येष्ठ  समाजसेवक  अण्णा हजारेंनी मापारींना राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवण्यास परवानगी दिली आहे. मापारींनी  राष्ट्रवादीकडून अधिकृत उमेदवारी मागितली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील वाडेगव्हाण जिल्हा परिषद गटातून मापारी निवडणूक लढवणार आहेत.

 

अण्णा हजारे यांचा हा निर्णय धक्कादायक म्हणावा लागेल. लोकपालच्या समितीवर शरद पवारांच्या नियुक्तीला अण्णा हजारे यांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर पवारांनी राजीनामा देणं पसंत केलं होतं. तसंच शरद पवारांवर दिल्लीत हल्ला झाला. त्यावेळेसही अण्णा हजारेंनी वादग्रस्त विधान करुन खळबळ उडवून दिली होती. तसंच आजवर अनेक वेळ शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांच्या भ्रष्टाचाराविरुध्द अण्णांनी रान उठवलं आहे. आता त्याच पक्षाकडून हजारे यांनी मापारींना परवानगी दिल्याने एका नव्या वादंगाला तोंड फुटण्याची चिन्हं आहेत.