जळगाव रुग्णालयाबाहेर सेना,मनसेचं आंदोलन

जळगावातल्या जिल्हा सरकारी रुग्णालयातल्या मेडिकल ऑफिसर डॉ.विजया चौधरी यांच्या हत्या प्रकरण आता चांगलंच तापत आहे. या हत्येप्रकरणी शिवसेना, भाजप आणि मनसे या राजकीय पक्षांनी रुग्णालयाच्या प्रशासनाला धारेवर धरलं आहे.

Updated: Mar 17, 2012, 03:07 PM IST

विकास भदाणे, www.24taas.com, जळगाव

 

जळगावातल्या जिल्हा सरकारी रुग्णालयातल्या मेडिकल ऑफिसर डॉ.विजया चौधरी यांच्या हत्या प्रकरण आता चांगलंच तापत आहे. या हत्येप्रकरणी शिवसेना, भाजप आणि मनसे या राजकीय पक्षांनी रुग्णालयाच्या प्रशासनाला धारेवर धरलं आहे.शिवसेना, भाजप आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन जळगावच्या जिल्हा सरकारी रुग्णालयाबाहेर आंदोलन केलं. महिला कार्यकर्त्यांनीही प्रशासनाला धारेवर धरलं आहे.

 

शिवसेना, भाजप आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन जळगावच्या जिल्हा सरकारी रुग्णालयाबाहेर आंदोलन केलं. महिला कार्यकर्त्यांनीही प्रशासनाला धारेवर धरलं आहे. जिल्हा सरकारी रुग्णालयातल्या मेडिकल ऑफिसर डॉ. विजया चौधरी यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी सिव्हील सर्जनला त्यांनी घेराव घातला आहे. अशा घटनांमुळे रुग्णालयातल्या महिला डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याचं सांगत राजकीय नेत्यांनी सिव्हील सर्जनला शिव्यांची लाखोली वाहिली आहे.

 

महिला कर्मचा-यांच्या सुरक्षेकडे रुग्णालय प्रशासन कानाडोळा करत असल्याचा आरोपही आता होत आहे. शिवाय २१ हजार रुपये किमंतीच्या दागिने चोरीनंतरही सीसीटीव्ही फुटेज वापरण्यास प्रशासनानं दिरंगाई केल्याचा आरोपही इथले कर्मचारी करत आहेत. विजया चौधरी यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींसह सिव्हील सर्जन आणि आरएमओवरदेखील कारवाईची मागणी राजकीय पक्षांनी केली आहे.

 

चोरीच्या घटनेसह एका महिलेवर रुग्णालयात बलात्कार झाल्याचा आरोपही होतोय. विजया चौधरी यांच्या हत्येमुळे जिल्हा सरकारी रुग्णालय प्रशासनावर प्रश्न निर्माण होतंय. यात आता राजकीय पक्षांनी उडी घेतल्यानं हत्या प्रकरण चांगलंच तापलंय.