शिक्षक नोकर भरतीतही आता घोटाळा

शिक्षण क्षेत्रामध्ये घोटाळा हे काही नविन नाही. पण आता शिक्षण क्षेत्रातील नोकर भरतीमधील सर्वात मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. अकोल्याच्या पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या ८३ वरिष्ठ आणि कनिष्ठ संशोधन सहाय्यकांना बडतर्फीची नोटीस बजावण्यात आली आहे.

Updated: Jan 1, 2012, 03:33 PM IST

झी २४ तास वेब टीम, अकोला 

 

शिक्षण क्षेत्रामध्ये घोटाळा हे काही नविन नाही. पण आता शिक्षण क्षेत्रातील नोकर भरतीमधील सर्वात मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. अकोल्याच्या पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या ८३ वरिष्ठ आणि कनिष्ठ संशोधन सहाय्यकांना बडतर्फीची नोटीस बजावण्यात आली आहे. २००५ मध्ये झालेल्या नोकर भरती घोटाळ्यात या सगळ्यांच्या नियुक्त्या झाल्या होत्या.

 

त्यांच्या सेवा आता २९ जानेवारीपासून समाप्त करण्यात येणार आहेत. या प्रकरणी राज्यपालांनी नियुक्त केलेल्या धाबे आयोगानं या शिफारसी केल्या होत्या. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

 

या भरती घोटाळ्यातील ३३ जणांवर मात्र अद्यापही कारवाई करण्यात आलेली नाही. विद्यापीठाच्या इतिहासात एकाचवेळी ८३ जणांवर कारवाईची ही पहिलीच वेळ आहे.