चंद्रपूरजवळ पट्टेदार वाघाची शिकार

चंद्रपूर शहराजवळ पट्टेदार वाघाची शिकार झाल्यानं खळबळ उडाली आहे. घनदाट जंगलात वाघाची शिकार करुन त्याचे अवयव कापून फेकल्याचं निदर्शनास आलंय. वनविभागाच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली आहे.

Updated: May 18, 2012, 12:54 PM IST

www.24taas.com, चंद्रपूर

चंद्रपूर शहराजवळ पट्टेदार वाघाची शिकार झाल्यानं खळबळ उडाली  आहे. घनदाट जंगलात वाघाची शिकार करुन त्याचे अवयव कापून फेकल्याचं निदर्शनास आलंय. वनविभागाच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली आहे.

गेल्या काही काळात चंद्रपूरच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरात सातत्यानं वाघाची शिकार होण्याच्या घटना घडतायेच. वनविभागाचा निष्काळजीपणाच याला कारणीभूत असल्याचं वन्यप्रेमींचं म्हणणं आहे. पंधरा दिवसांपूर्वीच चंद्रपूरजवळ एका वाघाची शिकार झाली होती. तर दुसरा वाघ सापळ्यात अडकला होता. मध्यप्रदेशच्या सीमेवरील आदिवासींच्या शिकारी टोळीनं 25 वाघांची शिकार करण्याची सुपारी घेतल्याची माहिती वनविभागाला मिळालीये. त्या अनुषंगानं राज्यात दक्षतेचा इशारा देण्यात आलाय.

जंगलातील पाणवठ्यांच्या जागेवर जादा वनरक्षक नेमण्याचे आदेश वरीष्ठांनी दिलेत. शिका-यांना रोखण्याचे आव्हान वनविभागापुढे आहे.