विरार परिसरात वाळू 'तापणार' ?

वसई-विरार परिसरात वाळू उपशावरून संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत. वैतरणा खाडीतून अवैध रेती उपशावर कोणतीच कारवाई होत नसल्याचा विरोधात नारंगी बंदरातल्या तब्बल ५ हजार रेती उत्पादकांनी तहसीलदार कचेरीवर मोर्चा काढून सेक्शन पंप बंद करण्याची मागणी केली आहे.

Updated: Apr 11, 2012, 04:14 PM IST

www.24taas.com, ठाणे

वसई-विरार परिसरात वाळू उपशावरून संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत. वैतरणा खाडीतून अवैध रेती उपशावर कोणतीच कारवाई होत नसल्याचा विरोधात नारंगी बंदरातल्या तब्बल ५ हजार रेती उत्पादकांनी तहसीलदार कचेरीवर मोर्चा काढून सेक्शन पंप बंद करण्याची मागणी केली आहे.

वारंवार पुरावे देऊनही प्रशासनाकडून कोणतीच कारवाई होत नसल्याचं रेती उत्पादकांचं म्हणणंय. येत्या पंधरा दिवसांत कारवाई न झाल्यास  रेल रोको करण्याचा इशारा रेती उत्पादकांनी तहसिलदारांना दिलाय. गेल्या काही वर्षांपासून या परिसरात खुलेआम अवैध रेती उपसा सुरु आहे.

वैतरणा खाडी पूलाच्या आजूबाजूलाही राजरोसपणे रेती उपसा सुरु असल्याचा आरोप होतोय. त्यामुळे भविष्यात ब्रीज कोसळण्याची भिती वर्तवण्यात येतेय.