www.24taas.com, ठाणे
विरारमध्ये २९ जानेवारीला सामुहिक विवाह सोहळा पार पडणार आहे. या सामुहिक विवाह सोहळ्यात ८५० जोडपी विवाहबद्ध होणार आहेत. या सोहळ्याची काही खास वैशिष्ट्य आहेत.
आमदार क्षितीज ठाकूर या सामुहिक विवाह सोहळ्यातच आपल्य वाङ्दत्त वधुशी लग्नबंधनात बांधले जाणार आहेत. त्यामुळे या सोहळ्याला १५० आमदार आणि १०० खासदारांची उपस्थिती असण्याची शक्यता आहे. या सामुहिक विवाह सोहळ्यात सर्व धर्मीय जोडपी विवाहबंधनात आडकणार आहेत. १०० ब्राम्हणांना यासाठी आधीच बोलावणं पाठवण्यात आलं आहे. प्रत्येक जोडप्याचं त्यांच्या धर्मानुसार लावण्यात येणार आहे. विरारच्या वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टनं या सामुहिक विवाह सोहळ्याचं आयोजन केलं आहे. या सोहळ्यासाठी जय्य्त तयारी करण्यात आलीय. प्रत्येक जोडप्याला मंगळसुत्रसह इतर सर्व गृहोपयोगी वस्तूही दिल्या जाणार आहेत.
लग्नानंतर या जोडप्यांची वरात काढली जाणार सून यावेळी हेलीकॉप्टरमधून पुष्पवृष्टीही केली जाणार आहे. महत्त्वाचं म्हणजे वसई विरार महापालिका क्षेत्रात राहणाऱ्या जी जोडपी या सोहळ्यात लग्न करमआर आहेत त्यांना पालिकेक़डून अनुदानही दिलं जाणार आहे.