पनवेल आरटीओतर्फे 'कुटुंब रंगलय काव्यात'

पनवेल आरटीओतर्फे 'कुटुंब रंगलय काव्यात' या विसूभाऊ बापट यांच्या काव्यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी रस्ते सुरक्षाविषयक वात्रटिका आणि कविता सादर केल्या.

Updated: Jan 14, 2012, 10:36 PM IST

स्वाती नाईक, www.24taas.com, मुंबई

 

पनवेल आरटीओतर्फे 'कुटुंब रंगलय काव्यात' या विसूभाऊ बापट यांच्या काव्यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी रस्ते सुरक्षाविषयक वात्रटिका आणि कविता सादर केल्या. रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने आरटीओतर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांतर्गत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

 

रस्त्यांवरील अपघातांना आळा घालण्यासाठी आरटीओतर्फे अनेक उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून मनेरंजनाच्या माध्यमातून रस्तेसुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी पनवेल आरटीओतर्फे विसूभाऊ बापट यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. गेली ३१ वर्ष विसूभाऊ 'कुटुंब रंगलंय काव्यात' हा काव्यांचा कार्यक्रम सादर करत आहेत. यावर्षी त्यांनी आरटीओच्या सुरक्षाविषयक उपक्रमाला हातभार लावण्यासाठी मिशन सुखरुप हा विषय घेऊन वर्षभर हा कार्यकर्म करण्याचं ठरवलंय. यावेळी त्यांनी खास फटका काव्यप्रकार सादर केला

 

या उपक्रमांतर्गत आरटीओतर्फे शालेय विद्यार्थ्यांच्या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धांचा बक्षिस वितरण सोहळा यावेळी पार पडला. या जनजागृती उपक्रमांमुळे रस्ते अपघात रोखण्यात आरटीओला यश येतं का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.