राज ठाकरे यांची माणुसकी....

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातल्या माणुसकीचं दर्शन आज ठाण्यात पहायला मिळालं. रस्त्यावर अपघातात जखमी अवस्थेत असलेल्या एका तरुणाला पाहून राज यांनी गाडी थांबवली.

Updated: Feb 8, 2012, 01:18 PM IST

www.24taas.com, ठाणे

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातल्या माणुसकीचं दर्शन आज ठाण्यात पहायला मिळालं. रस्त्यावर अपघातात जखमी अवस्थेत असलेल्या एका तरुणाला पाहून राज यांनी गाडी थांबवली.

 

एवढचं नाही तर गाडीत असलेल्या डेटॉलनं त्याच्या जखमाही पुसल्या. यानंतर जखमेवर मलम लावत त्यांनी या तरुणाच्या पायाचं मॉलिशही केलं. विनोद थोरात असं या तरुणाचं नाव असून, तो ठाण्याच्या लोकमान्य नगरचा रहिवासी आहे.

 

मुलुंडच्या दिशेनं येत असताना इस्चर्न एक्स्प्रेस हायवेवर येत असताना विनोदला अपघात झाला.. अपघातानंतर जखमी असलेल्या विनोदला राज ठाकरेंची माणुसकी पाहून गहिवरुन आलं.