www.24taas.com, नवी दिल्ली
प्रणव मुखर्जींची राष्ट्रपतीपदाची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी हमीद अन्सारी यांच्या नावाचीही चर्चा झाली होती. यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी यांनी हमीद अन्सारी यांना दुसरी पसंती दिली होती.
तृणमूल नेत्या ममता बॅनर्जी यांच्या दबाबाला बळी न पडता काँग्रेसने शेवटी प्रणव मुखर्जी यांनाच राष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिली. त्यामुळे एनडीएमध्येही फूट पाडण्यात काँग्रेसला यश आलं, आणि हमीद अन्सारी यांच्या नावाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांची सत्ताधारी यूपीएने उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली आहे.
त्यामुळे त्यांना उपराष्ट्रपतीपदाची दुसरी टर्म मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. काही काळापूर्वी त्यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात होती, मात्र हमीद अन्सारींऐवजी प्रणब मुखर्जी यांना ती संधी देण्यात आली त्यामुळे उपराष्ट्रपती पदासाठी पुन्हा एकदा अन्सारी यांनाच संधी देण्याचा निर्णय सत्ताधारी आघाडीने घेतला.