वॉलमार्ट येणार आपल्या दारी

सरकारने मल्टी ब्रँड रिटेल क्षेत्रात ५१ टक्के थेट परदेशी गुंतवणुकीला परवानगी दिली आहे. देशातील रिटेल उद्योग आता परदेशी सुपरमार्केटना गुंतवणुकसाठी खुलं करण्यात आल्याचं केंद्रीय मंत्र्यांनी पत्रकारांना सांगितलं.

Updated: Nov 24, 2011, 05:15 PM IST

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली

 

सरकारने मल्टी ब्रँड रिटेल क्षेत्रात ५१ टक्के थेट परदेशी गुंतवणुकीला परवानगी दिली आहे. देशातील रिटेल उद्योग आता परदेशी सुपरमार्केटना गुंतवणुकसाठी खुलं करण्यात आल्याचं केंद्रीय मंत्र्यांनी पत्रकारांना सांगितलं. जागतिक स्तरावरील बलाढ्या सुपरमार्केट सप्लाय चेनमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतील त्यामुळे पुरवठ्यातील अडथळे दूर होतील तसेच चलनवाढीला आळा बसेल.

 

भारताचे रिटेल क्षेत्रात वर्षाला ४५० बिलियन डॉलर एवढी उलाढाल होते. त्यामुळेच केंद्रीय कॅबिनेटच्या या निर्णयाचे स्वागत वॉल मार्ट सारख्या बलाढ्य कंपन्या करतील. सिंगल ब्रँड रिटेलिंगच्या क्षेत्रातही १०० टक्के परदेशी गुंतवणूकीला परवानगी देण्यात आली आहे.